News Flash

Car-Free City: खनिज तेल संपल्यावर काय? सौदी उभारतंय अख्खं शहर

जाणून घ्या या शहराच्या नियोजनाबद्दल...

सौदी अरेबिया आज तेल संपन्न देश आहे. पण भविष्यात कधी ना कधी तेल संपणार, त्यानंतर पुढे काय ? असा प्रश्न निर्माण होतो. त्या दृष्टीने सौदी अरेबियाने आतापासून तयारी सुरु केली आहे. तेलापलीकडे सौदी अरेबियाचं भवितव्य काय असेल? त्या दृष्टीने क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे.

सौदी अरेबिया कार, रस्ते विरहित तसेच जिथे कार्बन उत्सर्जन होणार नाही, असं शहर उभारणार आहे. सौदी अरेबिया ‘द लाइन’ नावाचे शहर उभारत आहे. हे शहर ५०० अब्ज डॉलर्सच्या ‘नियोम’ प्रकल्पाचा एक भाग आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या शहराच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याची घोषणा क्राऊन प्रिन्सने रविवारी केली. कार, रस्त्याशिवाय नैसर्गिक दृष्टीने या शहराची उभारणी करण्यात येणार आहे. ब्लूमबर्गने हे वृत्त दिले आहे.

या शहरात १० लाख लोकांच्या वास्तव्याची व्यवस्था असेल. २०३० पर्यंत या शहरात ३ लाख ८० हजार रोजगार निर्मिती होईल. या शहराच्या पायाभूत सोयी-सुविधांच्या उभारणीचा खर्च १०० अब्ज ते २०० अब्ज डॉलर्स असेल. ‘नियोम’ हा सौदी क्राऊन प्रिन्सच्या योजनेतील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.

‘नियोम’ टेक्नोलॉजिकल आणि काही अन्य उद्योगांचे केंद्र असेल. या प्रकल्पावरुन वादही झाला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला, तर त्यात अपेक्षित गुंतवणूक होईल का? असा विश्लेषकांचा सवाल आहे. पुढच्या १० वर्षात नियोममध्ये सौदी सरकार, पीआयएफ आणि स्थानिक, जागतिक गुंतवणूदार ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करतील असे क्राऊन प्रिन्सने पत्रकारांना सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 6:03 pm

Web Title: future beyond oil saudi crown prince plans for car free city dmp 82
Next Stories
1 करोना प्रतिबंध लसीकरण कार्यक्रम कसा असेल? पंतप्रधानांनी सविस्तर केलं स्पष्ट
2 मुलाच्या ऑनलाईन क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वडिलांनी टाकला पॉर्न व्हिडीओ
3 आपचा आमदार म्हणाला, “योगी की मौत सुनिश्चित हैं”; भाजपाकडून केजरीवाल यांना आव्हान, म्हणाले…
Just Now!
X