News Flash

चौहान यांना मौन पाळण्याचे आदेश!

चौहान यांच्या गुणवत्तेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह लावले आहे.

एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून गजेंद्र चौहान यांनी गुरुवारी पुण्यात पदभार स्वीकारल्यानंतर संकुलात कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान पहिल्यांदाच संस्थेत दाखल झाल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनांमुळे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात पुन्हा या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मंत्रालयातील सर्वच अधिकाऱ्यांना याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचा आदेश दिला, तर गजेंद्र चौहान यांना प्रतिक्रिया व्यक्त न करण्याची सूचना केली. गेल्या अनेक महिन्यांपासून चौहान यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थी व प्रशासनात संघर्ष सुरू आहे.

हा संघर्ष संस्थेच्या नियामक मंडळाच्या पहिल्याच बैठकीच्या दिवशी उफाळून आला. संस्थेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी आंदोलन करीत होते. या प्रकरणाची माहिती मंत्रालयाकडून घेण्यात आली. चौहान यांच्या गुणवत्तेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह लावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2016 2:59 am

Web Title: gajendra chauhan order to obey silence
टॅग : Ftii,Gajendra Chauhan
Next Stories
1 काँग्रेस-माकप आघाडी?
2 इंटरनेटमुळे झुंडीचे व्यक्त होणे धोकादायक
3 पवन कपूर इस्रायलमध्ये भारताचे नवे राजदूत
Just Now!
X