News Flash

सूर्यापेक्षा पाच हजार पट अधिक वस्तुमानाचे कृष्णविवर

जवळपास सर्व कृष्णविवरे शून्य ते दोन या आकारात येतात.

भारतीय वैज्ञानिकाचे संशोधन

सूर्यापेक्षा पाच हजार पटींनी अधिक वस्तुमान असलेल्या कृष्णविवराचा शोध मध्यम आकाराच्या कृष्णविवराच्या अस्तित्वाचा पुरावा भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाच्या नेतृत्वाखालील पथकाने शोधला आहे. कृष्णविवराचा असा मध्यम आकाराचा वर्ग असतो यावर या संशोधनाने शिक्कामोर्तब झाले आहे.
जवळपास सर्व कृष्णविवरे शून्य ते दोन या आकारात येतात. आंतरतारकीय वस्तुमान सूर्यापेक्षा अब्जावधी पट अधिक असलेल्या कृष्णविवरांचाही त्यात समावेश होतो. खगोल वैज्ञानिकांच्या मते मध्यम आकाराच्या कृष्णविवरात दोन टोकाचे आकार असू शकतात, पण त्याचे पुरावे मिळत नव्हते, पण ते आता मिळत आहेत. किमान सहा कृष्णविवरे या गटात सापडली आहेत. मेरीलँड विद्यापीठ व नासाच्या गोडार्ड स्पेस सेंटरच्या खगोलशास्त्रज्ञांनी नवीन मध्यम आकाराच्या व सूर्यापेक्षा पाच हजार पट जास्त वस्तुमानाच्या कृष्णविवराचे पुरावे दिले आहेत. मध्यम आकाराच्या कृष्णविवरांमध्ये त्यामुळे एकाची भर पडली आहे. याच वैज्ञानिकांनी अशाच वर्गातील कृष्णविवर ऑगस्ट २०१४ मध्ये शोधून काढले होते. पूर्वीच्या अभ्यासानुसार सूर्याच्या वस्तुमानापेक्षा ४०० पट अधिक वस्तुमान असलेले कृष्णविवर आहे व नासाच्या रोसी एक्स रे टायमिंग एक्स्प्लोरर उपग्रहाने व युरोपीय अवकाश संस्थेच्या एक्सएमएम न्यूटन उपग्रहाने त्याचे पुरावे दिले आहेत. आता ज्या कृष्णविवराचे पुरावे मिळाले आहेत, त्याचे नाव एनजीसी १२१३ एक्स १ असे आहे. ते कृष्णविवर म्हणजे क्ष किरणांचा स्रोत आहे. विश्वातील प्रखर क्ष किरणांचे ते स्रोत आहेत. काही खगोल वैज्ञानिकांच्या मते ही मध्यम आकाराची कृष्णविवरे मोठय़ा प्रमाणात वस्तुमान ओढत असून, त्यात घर्षण होऊन क्ष किरणांची निर्मिती होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर एनजीसी १२१३ एक्स १ कृष्णविवरातून क्ष किरणांची आतषबाजी होत आहे. एक कृष्णविवर मिनिटाला २७.६ वेळा प्रखर क्ष किरण बाहेर टाकते, तर दुसरे १७.४ वेळा क्ष किरण बाहेर टाकते. या संशोधनात भारतीय वंशाचे विद्यार्थी धीरज पाशम यांनी नेतृत्व केले असून ते स्पेस सायन्स इन्स्टिटय़ूटचे विद्यर्थी आहेत. नासाच्या गोडार्ड केंद्रातील संशोधकांनाही एमबी ८२ एक्स १ या कृष्णविवराची क्ष किरण प्रखरता व एनजीसी १२१३ एक्स १ या कृष्णविवराची क्ष किरण प्रखरता यांचे गुणोत्तर ३-२ असे दिसून आले आहे. त्यामुळे आताचे कृष्णविवर हे जास्त वेळा क्ष किरण बाहेर टाकते. आंतरतारकीय वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांसाठी हे गुणोत्तर
म्हणजे एक स्थायी गुणधर्म आहे की नाही हे अजून निश्चित नाही.
पाशम यांच्या मते कृष्णविवराजवळ जेव्हा जास्त वस्तुमान गुरुत्वाने दाबले जाते, त्यामुळे क्ष किरण निर्मिती होऊन ते चमकत असावेत. अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 12:58 am

Web Title: galaxy older than sun
टॅग : Galaxy
Next Stories
1 ब्रिटनच्या नागरिकाविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट
2 ५० अंश सेल्सियस तापमानाचीही भर..
3 सोमनाथ भारती यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी
Just Now!
X