News Flash

LAC Showdown: जगाकडून भारताचं सांत्वन

अमेरिकन अधिकाऱ्याने चीनला धरलं जबाबदार

गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चिनी सैन्याबरोबर लढताना भारताचे २० जवान शहीद झाले. जगातील अनेक देशांनी या संघर्षामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि मालदीव या देशांनी शोकभावना प्रगट करताना भारताचं सांत्वन केलं आहे.

जगातील अनेक देशांनी ज्या दिवशी भारताचं सांत्वन केलं, त्याचदिवशी म्हणजे काल चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून गलवान खोऱ्याच्या भागावर दावा सांगण्यात आला.

चीनचा अभ्यास असलेल्या एका अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याने गलवान खोऱ्यातील घटनेसाठी चीनला जबाबदार धरले आहे. चीनच्या कृतीमुळे १५ जूनच्या रात्री हा संघर्ष झाला. यापूर्वी सुद्धा अन्य सीमावादांमध्ये  चीनचे असेच वर्तन राहिले असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

आणखी वाचा- चिनी सैन्यामुळेच भारतीय सीमेवर तणाव; अमेरिकेचा चीनवर निशाणा

“हाँग काँग आणि भारतासंदर्भात चीनची भूमिका योग्य नसून, त्यांनी चांगले पावले उचलेली नाहीत” असे डेव्हीड स्टीलवेल यांनी म्हटले आहे. ते अमेरिकेचे पूर्व आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठीचे सहाय्यक सचिव आहेत.

‘भारतीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत’
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी गलवान खोऱ्यात झालेल्या चीन आणि भारत चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांप्रती दु:ख व्यक्त केलं. या दु:खाच्या प्रसंगात आम्ही प्रत्येक शहीद भारतीय जवानाच्या कुटुंबासोबत आहोत, असंही ते म्हणाले. दरम्यान, चीनचे अधिकारी यांग जियाची यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतरच त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 12:16 pm

Web Title: galvan valley clash world condoles india deaths dmp 82
Next Stories
1 सीमेजवळ BSF ने पाडलं पाकिस्तानचं सशस्त्र ड्रोन
2 आतापर्यंत शहरांना झळाळी दिली, आता गावांसाठी काम करा; पंतप्रधान मोदी यांचं स्थलांतरित मजुरांना आवाहन
3 मोदीजी, चीनला उत्तर द्यावंच लागेल : जितेंद्र आव्हाड
Just Now!
X