News Flash

गलवानमध्ये शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

सध्या त्या आपल्या मुलांसह दिल्लीत वास्तव्यास आहेत.

काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंही प्रत्युत्तर देत चीनच्या ४० सैनिकांना ठार केलं होतं. दरम्यान, या चकमकीत कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले होते. यानंतर तेलंगण सरकारनं संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी यांना सरकारी नोकरी देऊ केली आहे. तसंच त्यांच्याकडे उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी या आपल्या आठ वर्षांच्या मुलीसह आणि ३ वर्षांच्या मुलासह दिल्लीत राहत आहेत. दरम्यान, त्यांना तेलंगण सरकारनं सरकारी नोकरी देत त्यांच्याकडे उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी संतोष बाबू यांच्या सन्मानार्थ तेलंगण सरकारनं त्यांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रूपये देण्याची घोषणाही केली होती.

गेल्या महिन्यात भारत आणि चीनदरम्यान गलवान खोऱ्यात चीन आणि भारताच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षादरम्यान २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. यामध्ये काही अधिकाऱ्यांचादेखील समावेश होता. त्या ठिकाणी सुरू असलेल्या तणावादरम्यान कर्नल संतोष बाबू हे चीनच्या जवानांशी चर्चा करण्यासाठी गेले होतं. परंतु त्यानंतर चीनच्या जवानांनी हल्ला केला. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणावात अधिक वाढ झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 5:57 pm

Web Title: galvan valley india china standoff colonel santosh babu wife dy collector telanga govenrment cm reddy jud 87
Next Stories
1 भूमिपूजनाचं ठरलं; पाच ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन, सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
2 “७२ तासांमध्ये दूतावास बंद करुन चालते व्हा”; अमेरिकेचे चीनला फर्मान
3 योगी सरकारचे सर्वोच्च न्यायालयानं टोचले कान; “विकास दुबेसारखं एन्काउंटर पुन्हा होऊ देऊ नका”
Just Now!
X