देशातील परिस्थिती पाहता सध्याच्या समस्या सोडविण्यासाठी महात्मा गांधींच्या विचारसरणीचा अवलंब आपण केला पाहिजे असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते गांधीजींच्या १४४व्या जयंतीनिमित्त पोरबंदर येथील किर्ती मंदिराला भेट दिल्यानंतर बोलत होते.
मोदींनी किर्ती मंदिर या महात्मा गांधींच्या जन्मस्थानी पुष्पे वाहून राष्ट्रपित्यास अभिवादन केले.
मोदी म्हणाले, “गांधीवाद आजही अस्तित्वात आहे. फक्त त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्याचा अवलंब केल्यास सध्याच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. केवळ खादीची स्तुती न करता खादीचा स्विकारही आपण केला पाहिजे.” त्यानुसार खादीचा स्विकार करण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले.