02 March 2021

News Flash

नाराज अडवाणींच्या भेटीला नरेंद्र मोदी; दूर करणार नाराजी!

लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनात पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज(गुरूवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली.

| March 20, 2014 01:51 am

लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनात पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज(गुरूवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली.
‘अड’वाणी पुन्हा रुसले!
गांधीनगर मतदारसंघातून अडवाणी पाच वेळा खासदार म्हणून निवडणून आले आहेत. मात्र, यावेळी आपल्याला भोपाळमधून उमेदवारी दिली जावी, अशी इच्छा त्यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे व्यक्त केली होती. यामागे मोदींशी बिघडलेले संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते. अडवाणींच्या इच्छेला बगल देत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने अडवाणींना गांधीनगरमधूनच उमेदवारी जाहीर केली. यावर नाराज झालेल्या अडवाणींची मनधरणी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी अडवाणींची भेट घेतल्याचे समजते.
अडवाणींना राजी करण्यासाठी सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासह माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काल रात्री उशीरा अडवाणींच्या निवासस्थानी धाव घेतली होती. त्यानंतर आज खुद्द नरेंद्र मोदींनी अडवाणींची भेट घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2014 1:51 am

Web Title: gandhinagar seat in bid to placate fuming advani modi and sushma meet party patriarch
Next Stories
1 ख्यातनाम पत्रकार व लेखक खुशवंत सिंग यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन
2 ‘भाजप’ नेत्याची गोळ्या झाडून हत्या!
3 दुसऱ्या शीतयुद्धाची नांदी?
Just Now!
X