कर्नाटकातील कोलार जवळील मरदघट्टा गावात गणेशमूर्ती विसर्जनावेळी १६ वर्षाखालील सहा मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. यामध्ये चार मुली व दोन मुलांचा समावेश आहे. या मृत मुलांच्या कुटूंबीयांना कर्नाटक सरकारकडून दोन लाख रूपयांची मदत देण्यात जाहीर करण्यात आली आहे.
Karnataka Chief Minister BS Yediyurappa announces ex-gratia Rs 2 lakhs each to the families of the six children who drowned during Ganesh idol immersion, in Kolar today. (file pic) pic.twitter.com/suqTCGjq0f
— ANI (@ANI) September 10, 2019
शासकीय सुट्टी देण्यात आलेली असल्याने ही मुलं घरच्यांची परवानगी न घेताच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गेली होती. रात्री उशीरापर्यंत मुलं घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी सर्वत्र शोध घेणे सुरू केले. तेव्हा त्यांना या दुर्घटनेबाबत माहिती मिळाली.
उपस्थितींच्या माहितीनुसार ही मुलं गणेशमूर्ती विसर्जित केली जात असताना सुरू असलेल्या गडबड गोंधळात पाण्यात पडली होती. याप्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आलेली आहे.
या मुलांना बुडाताना पाहून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काहीजणांनी त्यांना पाण्याबाहेरही काढले. मात्र तोपर्यंत त्यांच्या नाकातोंडात मोठ्याप्रमाणात पाणी गेले असल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. यावर त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल केले गेले. मात्र तोपर्यंत त्यांचा प्राणज्योत मालवली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 9:20 pm