आंध्र प्रदेशात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन तरुणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सलग पाच दिवस पीडित तरुणीवर बलात्कार करण्यात आला. आंध्र प्रदेशातील ओंगोले शहरात ही घटना घडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या घटनेमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गृहमंत्री एस सुचरिता यांनी याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. प्रकाशम जिल्ह्याचे पोलीस अधिधक्ष सिद्धार्थ कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘१७ जून रोजी पीडित तरुणी ओंगोले येथे आरटीसी बस स्थानकावर उभी असता आरोपींपैकी एका तरुणाने मुलीशी मैत्री केली. यानंतर तो तिला आपल्यासोबत रुमवर घेऊन गेला जिथे त्याने आणि त्याच्या पाच मित्रांनी सलग पाच दिवस तरुणीवर बलात्कार केला’.

maratha reservation
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

यानंतर पीडित तरुणीने आपली सुटका करुन घेतली आणि शनिवारी रात्री बस स्थानक गाठलं. तिथे कर्तव्यावर असणारे होमगार्ड वेंकेटेश्वरलू आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू राव यांनी तिला पाहिलं आणि सुटका केली असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. यानंतर तरुणीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतलं आहे. आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक गौतम सावंग यांनी घटनेचा निषेध केला असून महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. ‘ही अत्यंत क्रूर गुन्हा असून अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सर्वोपतरी प्रयत्न करु’, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.