News Flash

१६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करत शूट केला व्हिडीओ, सोशल मीडियावर केला व्हायरल

एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत

उत्तर प्रदेशात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी बलात्कार करताना मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल केला. कौशंबी जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपींपैकी एकजण गावकऱ्यांच्या तावडीत सापडला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गावकरी आरोपीला मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये आरोपी स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी धडपडताना दिसत आहे. आरोपी मोहम्मद नजीम याला पोलिसांनी अटक केली असून इतर दोन आरोपी मोहम्मद चोटका आणि बडका फरार आहे. हे दोघेही भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “आपण शेजारच्या गावात चारा गोळा करण्यासाठी गेलो असताना तिन्ही आरोपींनी आपल्यावर हल्ला केला. तेथून जबरदस्ती करत एका निर्जनस्थळी नेलं आणि बलात्कार केला. मी एका फळांच्या बागेत होते तेव्हा आरोपींना पाठीमागून आपल्यावर हल्ला केला आणि ओढत नेलं. त्यांना माझ्यासोबत वाईट कृत्य केलं. मी तेथून पळ काढला, पण पळताना शेतात पडले”.

पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला होता, तसंच बलात्कार झाल्याचा पुरावा काय आहे ? अशी विचारणा केली होती. दरम्यान फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 11:25 am

Web Title: gangrape on 16 year old girl in up sgy 87
Next Stories
1 बोरिस जॉन्सन, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री; मलिहा लोधींमुळे पाकची फजिती
2 सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X