04 March 2021

News Flash

पश्चिम बंगालमध्ये गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

महिलेवर उपचार सुरु असून तिच्या प्रसूतीत कोणती अडचण येऊ नये याची काळजी घेतली जात आहे

पश्चिम बंगालमध्ये एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची मेहुणी भाजपाच्या तिकीटावर पंचायत निवडणूक लढवत असून तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी धमक्या देऊनही तिने उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला होता. आरोपी तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

पीडित महिलेला स्थानिक रुग्णालयातून कोलकातामधील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. महिलेवर उपचार सुरु असून तिच्या प्रसूतीत कोणती अडचण येऊ नये याची काळजी घेतली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला असून बलात्कार, दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

तृणमूल काँग्रेस नेते अरिंदम भट्टाचार्य यांनी मात्र आरोप फेटाळून लावले आहेत. यामध्ये कोणताही राजकीय संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे त्यांचं पती आणि पत्नीमधील कौटुंबिक भांडण असून, मुद्दामून त्याला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार, घरात महिला, तीन वर्षांचा मुलगा आणि सासू असताना काहीजण जबरदस्ती घरात घुसले आणि तोडफोड सुरु केला. यावेळी काहीजण महिलेच्या रुममध्ये शिरले आणि बलात्कार केला. यावेळी इतरजण घराबाहेर होते. केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे घटनेची तक्रार केली आहे. भाजपाने आरोपींविरोधात कारवाई व्हावी यासाठी रुग्णालयाबाहेर आंदोलनही केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 6:25 pm

Web Title: gangrape on pregnant woman in bengal
Next Stories
1 कर्नाटक निवडणूक : आता सिद्धरामय्यांनी मोदींना दिले १५ मिनिटांचे ‘हे’ आव्हान
2 कोण आहे पत्रकार जिग्ना वोरा ? अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी काय होते कनेक्शन
3 ‘आप्पा…माझ्यावर अंत्यसंस्कार करु नका’; वडिलांच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून मुलाची आत्महत्या
Just Now!
X