06 December 2019

News Flash

सरकारी निवासस्थानीच महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश

तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास करत आहेत

ओडिशामध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये माजी पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. पोलीस कॉन्स्टेबलने इतर सहकाऱ्यांसोबत मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. आऱोपींपैकी एकाने तरुणीला आपण पोलीस अधिकारी असल्याचं भासवत मदत करण्याचा बहाणा केला आणि सामूहिक बलात्कार केला.

घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीला पुरी जिल्ह्यात नेलं आणि सामूहिक बलात्कार केला. तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तरुणी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती. ती आपल्या गावी चालली होती. यावेळी चार आरोपी ज्यापैकी एकाने आपण पोलीस अधिकारी असल्याचं भासवलं त्यांनी तरुणीला मदत करण्याचा बहाणा केला.

“मी माझ्या गावी चालली होती. जेवण्यासाठी खाली उतरली असता बस पुढे निघून गेली. बस स्टँडला उभी असता एका व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असल्याचं सांगत मला ओळखपत्र दाखवलं आणि मदत देऊ केली. जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली आणि कारमधून पुरी येथील सरकारी निवासस्थानी घेऊन गेले,” अशी माहिती पीडित तरुणीने दिली आहे.

पीडित तरुणीच्या होती पोलीस कॉन्स्टेबलचं पाकीट आणि ओळखपत्र लागलं होतं. “दोघांनी बाहेरुन लॉक केलं तर दोघांनी माझ्यावर अत्याचार केला. मद्यपान केल्यानंतर जेव्हा आरोपी झोपले होते तेव्हा मी खिडकीतून एका व्यक्तीकडे मदत मागितली आणि तेथून पळ काढला. माझ्या हातात आरोपी असणाऱ्या पोलिसाचं पाकिट आणि ओळखपत्र होतं,” असं पीडित तरुणीने सांगितलं आहे. तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास करत आहेत.

First Published on December 3, 2019 9:04 am

Web Title: gangrape on woman in government quarter in puri sgy 87
Just Now!
X