16 January 2021

News Flash

अपहरण, बलात्कार आणि ब्लॅकमेल; सुसाईड नोट लिहून पीडितेने घेतला गळफास

तीन महिने झाल्यानंतर पोलिसांनी पहिली अटक केली आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

अपहरण करुन सामूहिक बलात्कार करत नंतर ब्लॅकमेल करण्यात आलेल्या १९ वर्षीय पीडित तरुणीने आत्महत्या केली आहे. कोणतीही मदत मिळत असल्याने पीडितेने सुसाइड नोट लिहून आपलं आयुष्य संपवलं. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर आणि एफआयआर दाखल होऊन तीन महिने झाल्यानंतर पोलिसांनी हरियाणामधून पहिली अटकेची कारवाई करत दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मेरठमधील बुलंदशहरमध्ये ही घटना घडली आहे.

“३ ऑक्टोबर रोजी तरुणीने मोहम्मद कमरुद्दीन या मुख्य आरोपीविरोधात छळ आणि धमकावल्याप्रकऱणी तक्रार दाखल केली होती,” अशी माहिती बुलंदशहरचे एसएसपी संतोष सिंह यांनी दिली आहे. “मात्र कोर्टात देण्यात आलेल्या जबाबात पीडितेने आपला जबाब बदला होता. यामुळे अंतिम अहवालात आरोला निर्दोष सांगण्यात आलं होतं,” अशी माहिती त्यांनी दिली आहे. सुसाईड नोटमध्ये पीडितेने लिहिलं आहे की, आरोपीने माफी मागितल्याने आपण त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.

१६ ऑक्टोबरला कमरुद्दीन याने पहाटे ४ वाजता गावाबाहेर भेटायला बोलावल्याचा चिठ्ठीत उल्लेख आहे. आठ दिवसांनी पीडितेने अजून एक तक्रार दाखल केली. यामध्ये तिने कमरुद्दीन, तिचे काका मुबीन आणि मित्र मोहम्मद अकबर यांचा उल्लेख केला होता. “तरुणी तक्रारीत तिघांनी आपलं घरातून अपहरण करुन सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप होता,” अशी माहिती संतोष सिंह यांनी दिली आहे. त्यादिवशी २४ ऑक्टोबरला यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता.

सुसाईड नोटमध्ये लिहिल्यानुसार, बलात्कार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावर सोडून दिलं होतं. बलात्काराचा व्हिडीओही शूट करण्यात आला होता. तक्रार दाखल केली तर हा व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी देण्यात आली होती.

हे सर्व होत असताना तपासात मात्र काहीच प्रगती झाली नव्हती. संतोष सिंह यांनी मात्र हा आरोप सिद्ध झाला नसल्याचं म्हटलं आहे. सोमवारी मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी कारवाई न केल्यानेच मुलीने आत्महत्या केल्याचा वडिलांचा आऱोप आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे अजून एक एफआयआर दाखल करण्यात आला.

तपास अधिकारी आणि अनुपशहर पोलीस स्टेशन इन चार्ज यांच्यावर कारवाई करत निलंबन करण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्याने प्रकरणाचा छडा लावायला हवा होता, पण त्यांनी तसं केलं नाही असं संतोष सिंह यांनी म्हटलं आहे. कमरुद्दीन याला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली असून इतर दोघे फरार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 9:29 am

Web Title: gangrape victim commit suicide in bulandshahar sgy 87
Next Stories
1 गायींच्या संरक्षणासाठी मध्य प्रदेशात ‘गौ-कॅबिनेट’ची स्थापना
2 “काहीही न करता बोलणं म्हणजे अंतर्मुख होणं नसतं, अगोदर काम करा…. ”
3 रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत मोठा झालो : बराक ओबामा
Just Now!
X