News Flash

वाँटेड गुन्हेगाराला मुंबईहून उत्तर प्रदेशला नेताना कार पलटी झाली, गँगस्टरचा जागीच मृत्यू

विकास दुबे एन्काऊंटरच्यावेळी जे घडलं, तसचं पुन्हा एकदा यूपीच्या गँगस्टरसोबत झालं...

संग्रहित छायाचित्र

वाँटेड गँगस्टरला मुंबईतून अटक करुन उत्तर प्रदेशला नेत असताना वाटेत मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये त्या गँगस्टरचा मृत्यू झाला आहे. फिरोज अली उर्फ शामी असे या गँगस्टरचे नाव आहे. लखनऊ पोलिसांच्या टीमने शनिवारी फिरोज अलीला नालासोपारा येथील झोपडपट्टीतून अटक केली.

पोलीस त्याला कारने उत्तर प्रदेशला नेत असताना, मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात पोलिसांची कार पलटी झाली. त्यामध्ये फिरोज अलीचा मृत्यू झाला. या अपघातात तीन पोलीसही जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग २६ वर अपघाताची ही घटना घडली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

या घटनेने गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलिस हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलीस मध्य प्रदेशातून अटक करुन, कानपूरला घेऊन येत असताना अशाच प्रकारे वाहन पलटी झाले होते. त्यानंतर तिथून पळण्याचा प्रयत्न करणारा विकास दुबे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 9:47 am

Web Title: gangster killed as lucknow police car bringing him back from mumbai overturns dmp 82
Next Stories
1 NDA फक्त नावाला, इतक्या वर्षात पंतप्रधानांनी बैठकही बोलावली नाही – सुखबीर सिंग बादल
2 आर्मेनिया-आझरबैजान संघर्ष : एकमेकांचे रणगाडे, हेलिकॉप्टर्स उद्धवस्त केले; १६ जणांचा मृत्यू
3 Unlock 5 : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शिथिल होणार?; आज होऊ शकते नव्या नियमांची घोषणा
Just Now!
X