28 September 2020

News Flash

गँगस्टर रवी पुजारीला अटक, १५ वर्षांनी अडकला जाळ्यात

इंटरपोलने डीआयसीच्या मदतीने ही अटकेची कारवाई केली

गँगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात आली आहे. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. बंगळुरु पोलिसांनी रवी पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. इंटरपोलने डीआयसीच्या मदतीने ही अटकेची कारवाई केली. तपास यंत्रणांनी रवी पुजारीला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी सेनेगेलसोबत चर्चा सुरु आहे.

रवी पुजारीने अनेक अंडरवर्ल्ड डॉनसोबत काम केलं आहे. दोन दशकांपूर्वी त्याने स्वत:चा वेगळा गट तयार केला होता. त्याच्यावर अनेक देशांमध्ये खंडणी तसंच हत्येचे गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रवी पुजारी अँथनी फर्नांडिस या नावाचा पासपोर्ट घेऊन प्रवास करत होता. दरम्यान रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी विशेष विमान पाठवण्यात आल्याचं कळत आहे.

गेल्या १५ वर्षात रवी पुजारीविरोधात अनेक देशांमध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. याआधी तो ऑस्ट्रेलियात लपला असल्याची शक्यता वर्तवली जात होती. तेथूनच तो मुंबईत आपल्या हस्तकांमार्फत टोळी चालवत असल्याचं सांगितलं जात होतं. रवी पुजारीने सध्या अटकेत असलेल्या छोटा राजनसोबतही काम केलं आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये छोटा राजनचं इंडोनेशियामधून प्रत्यार्पण करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 10:47 pm

Web Title: gangster ravi pujari arrested
Next Stories
1 सहा पाणबुडया बांधण्याच्या ४० हजार कोटीच्या प्रकल्पाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
2 ४५ वर्षातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक असल्याचा अहवाल नीती आयोगाने फेटाळला
3 मुकेश अंबानींची मुले इशा आणि आकाशचा जन्म आयव्हीएफ तंत्राने
Just Now!
X