News Flash

धक्कादायक! मूल होत नाही म्हणून सासरच्यांनी महिलेच्या गुप्तांगावर गरम लोखंडी सळ्यांनी दिले चटके

घरातील एका खोलीमध्ये डांबून ठेवत तिला गरम लोखंडाच्या सळ्यांनी चटके दिले, तिने कशीतरी स्वत:ची सुटका करुन घेत माहेरच्यांना घडलेला प्रकार कळवला

तिने माहेरच्या व्यक्तींना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. (प्रातिनिधिक फोटो)

झारखंडमध्ये महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसोंदिवस वाढ होता दिसत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार धुरकी पोलीस स्थानक क्षेत्रामधील परसपानी गावामध्ये घडलाय. येथील एका महिलेचा तिच्या सासऱ्या मंडळींनी अगदी अमानुषपणे छळ केल्याची माहिती समोर आली आहे. पिडीत महिलेच्या शरीराच्या कंबरेखालील भागावर तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी लोखंडाच्या गरम सळ्यांनी चटके दिले आहेत. लोखंडाच्या गरम सळ्यांनी या महिलेच्या कंबरेखालील भागावर अनेक ठिकाणी चटके देण्यात आल्याचा आरोप महिलेने केलाय. इतकच नाही तर सासरच्या मंडळींनी या महिलेच्या गुंप्तांगावरही लोखंडाच्या गरम सळ्यांनी चटके दिल्याचं सांगण्यात येत आहे. या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपाचार सुरु आहेत. सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून ही महिला स्वत: घर सोडून पळाली. जंगलांमधून वाट शोधत शोधत ही महिला मुख्य रस्त्यावर या रुग्णालयामध्ये पोहचल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर १२ वर्षांनंतरही मूल होत नसल्याने या महिलेच्या पतीने आपल्या घरच्यांच्या मदतीने या महिलेवर अशाप्रकार अमानुष अत्याचार केला. आरोपीचं नाव दिनेश प्रसाद गुप्ता असं असून पिडितेचं नाव लक्ष्मीदेवी असं आहे. लक्ष्मी यांना लग्नानंतर संततीप्राप्ती झाली नाही. याच मुद्द्यावरुन झालेल्या वादानंतर दिनेशने त्यांचे वडील, भाऊ आणि वहिनीच्या मदतीने लक्ष्मीदेवीला घरातील एका खोलीमध्ये डांबून ठेवत तिला गरम लोखंडाच्या सळ्यांनी चटके दिले. या महिलेवर सध्या उपचार सुरु असले तरी तिला गंभीर जखमी झाल्या असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

पीडितेने दिलेल्या कबुली जबाबानुसार हा अत्याचार झाल्यानंतर तिने घरच्यांपासून लपून आपल्या माहेरच्या व्यक्तींना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. पीडितेची सावत्र आई, पुष्पाजंलि देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीला मूल होत नसल्याने तिच्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला. कशीतरी ती मोबाइल घेऊन घरातून पळाली आणि तिने आम्हाला यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात पीडितेचा जबाब नोंदवला असून पुढील तपास केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 5:07 pm

Web Title: garhwa jharkhand woman private part burn with hot rod by husband and in laws scsg 91
Next Stories
1 साध्वी प्रज्ञा सिंह यांनी घरात घेतली करोना लस; विशेष सूट कशासाठी? काँग्रेसचा सवाल
2 करोनाची तिसरी लाट कधी येणार? WHO च्या प्रमुखांनी दिलं उत्तर; म्हणाले, “दुर्दैवाने…”
3 कावेबाज चीनच्या कुरापती; सीमेजवळ पुन्हा एकदा बांधकामाला सुरुवात
Just Now!
X