घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात बुधवारी ५० रुपयांची वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतवाढीमुळे या महिन्यात सलग दुसऱ्यांदा ही वाढ झाली आहे.

विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ६४४ रुपयांवरून ६९४ रुपये झाली आहे. याआधी १ डिसेंबरला सिलिंडरदरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तत्पूर्वी जुलैमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, चालू महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत एकूण १०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विनाअनुदानित सिलिंडरसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, हवाई इंधन दरामध्येही ६.३ टक्के वाढ करण्यात आली आहे.