26 September 2020

News Flash

पँगाँग सरोवराजवळ भारत-चीन सैन्याची जमवाजमव

दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान फक्त ४००-५०० मीटरचे अंतर

संग्रहित छायाचित्र

 

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर काठावर गेल्या ४८ तासांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मोठय़ा प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली असून, भारतानेही तिथे मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत.

चिनी सैन्य मेपासून फिंगर ४ पर्वतरांगांजवळ तळ ठाकून आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण काठापासून ते ‘रेझांग ला’ जवळच्या ‘रचिन ला’पर्यंतच्या मार्गावरील उंच ठिकाणांवर भारतीय लष्कराने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ठिकाणांवर ताबा मिळविण्याचा आता चीनचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

चीनने संपूर्ण सैन्यमाघारीची तयारी दर्शवली होती. मात्र, चिनी सैन्याने फिंगर ४ पर्वतरांगांतून कधीच माघार घेतलेली नसून, त्यांनी या पर्वतरांगांच्या वरील भागात सुमारे २ हजार सैनिकांची जमवाजमव केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चिनी सैन्याच्या हालचाली लक्षात घेऊन भारतीय लष्करानेही मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत. तेथील परिस्थिती तणावपूर्ण असून, दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान फक्त ४००-५०० मीटरचे अंतर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:14 am

Web Title: gathering of indo chinese troops near pangong lake abn 97
Next Stories
1 ‘कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी अमित शाह यांची ऋणी आहे’, कंगनाच्या आईची प्रतिक्रिया
2 लडाख वाद : पँगोंग त्सोमध्ये उंचीवर पोहोचलं भारतीय लष्कर; चीनविरोधात स्थिती मजबूत
3 कंगना-शिवसेना वादावर वाराणसीत झळकलं वादग्रस्त पोस्टर; महाभारतातील ‘वस्त्रहरण’ प्रसंगाचा वापर
Just Now!
X