News Flash

दिल्ली-आग्रा गतिमान एक्सप्रेसमुळे प्रवास वेगवान

प्रभू यांनी सांगितले की, पहिली निम्न उच्चगती गाडी सुरू करताना आनंदच होत आहे.

| April 6, 2016 02:41 am

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी दिल्ली-आग्रा दरम्यान १०० मिनिटांत २०० कि.मी. अंतर कापणाऱ्या गतिमान एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. 

निम्न उच्च वेगवान गाडय़ांचा जमाना भारतात सुरू झाला असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी दिल्ली-आग्रा दरम्यान १०० मिनिटांत २०० कि.मी. अंतर कापणाऱ्या गतिमान एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीत रेल्वेसुंदऱ्यांनी प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या गाडीचा वेग कमाल १६० कि.मी आहे. निझामउद्दीन स्थानकावरून ही गाडी सनईच्या सुरावटीत पहिल्या प्रवासाला निघाली. प्रभू यांनी सांगितले की, पहिली निम्न उच्चगती गाडी सुरू करताना आनंदच होत आहे. साधारण व एक्सप्रेस गाडय़ांचा वेग रफ्तार योजनेत वाढवण्याचा विचार आहे, पण ते सोपे काम नाही.

गतिमान एक्सप्रेस शाही निळ व राखाडी रंगाची असून मध्ये पिवळा पट्टा आहे. या गाडीत भारतीय व काँटिनेंटल अन्नाची व्यवस्था केलेली आहे. ५५०० अश्वशक्तीचे इंजिन या गाडीला असून त्यात दोन एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार, आठ एसी चेअर कार डबे आहेत. या गाडीला उच्च शक्ती आपत्कालीन ब्रेक प्रणाली आहे.

आगीची सूचना, जीपीएस आधारित प्रवासी माहिती सेवा, डब्यांना सरकते दरवाजे, डब्यांमध्ये जैव स्वच्छतागृहे, मोठय़ा खिडक्या, मोफत बहुमाध्यम सेवा (मल्टीमीडिया) या सुविधा आहेत. त्यात बातम्या, चित्रपट व कार्टून पाहण्याची सोय आहे. आग्रा लगतच्या पर्यटनस्थळांची छायाचित्रे डब्यांना सुशोभित करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि सुखावह होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 2:41 am

Web Title: gatimaan express cover delhi to agra distance in 100 min check out the interiors
टॅग : Suresh Prabhu
Next Stories
1 केंद्र सरकारवर रावत यांचे टीकास्त्र
2 ‘मोहम्मद यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा’ – राहुल गांधी
3 कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी सोमनाथ भारतींविरुद्ध आरोपपत्र
Just Now!
X