गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक झालेल्या परशुराम वाघमारे या आरोपीची रवानगी सोमवारी न्यायालयीन कोठडीत झाली. धर्म रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुरामने दिली होती.

पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ११ जून रोजी कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील सिंधागी येथून परशुराम वाघमारे (वय २६) याला अटक केली होती. परशुरामला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता पुढील चौकशीसाठी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी परशुरामला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने परशुरामला न्यायालयीन कोठडी सुनावली.  २७ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गौरी लंकेश यांची हत्या कशी झाली; जाणून घ्या आरोपीने ‘SIT’ला सांगितलेला घटनाक्रम

दरम्यान, पोलीस चौकशीत परशुरामने गुन्ह्याची कबुली दिली होती. ‘मे २०१७ मध्ये मला सांगण्यात आले की धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे. मीदेखील त्यासाठी तयार झालो. मात्र, आता मला असे वाटते की मी एका महिलेची हत्या करायला नको होती’, असे परशुरामने चौकशीदरम्यान सांगितले होते.