21 September 2020

News Flash

रस्त्यावर भीक मागणाऱ्या सेवानिवृत्त जवानाच्या मदतीसाठी गौतम गंभीरचे आवाहन

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाला एका सेवानिवृत्त जवानाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाला एका सेवानिवृत्त जवानाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. पीतांबरन असे या जवानाचे नाव आहे. पीतांबरन शनिवारी दिल्ली कनॉट प्लेस येथे भीग मागत असल्याचे दिसल्यानंतर गंभीरने टि्वट करुन मदत करण्याचे आवाहन केले. गौतम गंभीर नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांवर जागरुक असतो.

पीतांबरनच्या एका हातात काठी तर दुसऱ्या हातात ‘मला तुमच्या मदतीची गरज आहे’ असा एक फलक आहे. अलीकडेच पीतांबरनचा अपघात झाला. सध्या त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. तांत्रिक कारणांमुळे सेवानिवृत्त जवानाला लष्कराकडून आवश्यक मदत मिळालेली नाही.

गंभीरने संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि भारतीय लष्काराला याबाबतीत हस्तक्षेप करण्याची विनंती केली. पीतांबरन १९६५ आणि ७१ च्या युद्धात सहभागी झाले होते. त्यांच्या ओळखपत्रावरुन त्याची पडताळणी करता येऊ शकते असे गंभीरने टि्वटमध्ये म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने गंभीरच्या या टि्वटला लगेच प्रतिसाद दिला. तुम्ही जी चिंता व्यक्त केली ती खरोखरच चांगली गोष्ट आहे. आम्ही लवकरात लवकर आवश्यक ते सहकार्य करु असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने टि्वटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 8:11 pm

Web Title: gautam gambhir asks army to help veteran begging on delhi streets
Next Stories
1 ‘बेरोजगारीने मोदी सरकारचे नाक कापले, अर्थसंकल्पाच्या सर्जरीने जोडले’
2 ऋषी कुमार शुक्ला नवे CBI संचालक
3 ‘त्या’ व्हिडिओमुळे मोडले तिचे ठरलेले लग्न
Just Now!
X