News Flash

राम मंदिरासाठी गंभीरने दिली एक कोटी रुपयांची देणगी

राम मदिंराच्या उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे

राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा करण्याचे अभियान सुरू झाल्यानंतर भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी या कार्यासाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ‘जुना वाद आता संपला आहे. त्यामुळे आता देशात एकता आणि शांतता प्रस्थापित होईल. मंदिराच्या उभारणीसाठी मी आणि माझ्या कुटुंबांनं एक छोटीशी देणगी दिली आहे, असं गौतम गंभीर म्हणाला. ‘

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राम मदिंराच्या उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गजांनी देणगी दिली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमीपूजन करण्यात आले होते. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपूर्वी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेने या वर्गणी अभियानाला सुरुवात केली आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे, अशी सर्व भारतीयांची इच्छा असल्याचं सांगत गौतम गंभीरने आपल्या परिवारातर्फे एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 11:44 am

Web Title: gautam gambhir contributes rs one crore for ram temple construction nck 90
Next Stories
1 IND vs AUS: ‘जेवढं यश भारतीय संघाचं तितकचं’…इंझमाम उल हक म्हणाला…
2 क्रृणालबरोबरचा वाद पडला महागात, BCA नं दीपक हुड्डावर केली मोठी कारवाई
3 अजिंक्यला कांगारुचा केक कापण्यास सांगितलं मात्र…; ही बातमी वाचून तुम्हालाही वाटेल रहाणेचा अभिमान
Just Now!
X