News Flash

गौतम गंभीरचं अभिमानास्पद पाऊल, १०० शहीद जवानांच्या मुलांचा खर्च उचलणार

ट्विटरवरुन केली घोषणा

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेत खासदार निवडून गेलेल्या गौतम गंभीरने पुन्हा एकदा आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून, गंभीर १०० शहीद जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलणार आहे. गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.

या सर्व मुलांच्या शहीद वडिलांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे, यासाठी आपण त्याने कायम ऋणी राहणार आहोत हे दाखवण्याची वेळ आता आली आहे, असं म्हणत गंभीरने या नवीन उपक्रमाबद्दल घोषणा केली आहे. दरम्यान गौतम गंभीरने सोमवारी वयाच्या ३९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2019 2:01 pm

Web Title: gautam gambhirs foundation to take care of 100 children of martyrs psd 91
टॅग : Gautam Gambhir
Next Stories
1 जम्मू-काश्मीर : हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक
2 सध्याच्या परिस्थितीत युद्ध कोणाला परवडणारे नाही – अजित डोवाल
3 अयोध्येत १० डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू; सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Just Now!
X