30 October 2020

News Flash

समलैंगिक जोडीदाराने केली आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याची हत्या

आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता नवीन दासच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी तीन जणांना अटक केली. गाडीमध्ये त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता.

दिल्लीस्थित आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता नवीन दासच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी तीन जणांना अटक केली. चार ऑक्टोंबरच्या रात्री साहिबाबादमधील तीला मोर-भोपूरा रस्त्यावर नवीनच्या गाडीमध्ये त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन दासचे तय्यब नावाच्या व्यक्तिसोबत समलैंगिक संबंध होते. तय्यब (२५) या प्रकरणात आरोपी आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नवीन दास तय्यबवर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहाण्यासाठी दबाव टाकत होता.

त्याने तय्यबचे काही अश्लील व्हिडिओ सुद्धा बनवले होते. लिव्ह इन रिलेशनशिपची मागणी मान्य केली नाही तर सर्व व्हिडिओ सार्वजनिक करेन अशी दासने तय्यबला धमकी दिली होती. मुरादनगर येथे रहाणार तय्यब एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत नोकरी करतो. नवीन दासपासून सुटका करुन घेण्यासाठी त्याने भाऊ तालीब आणि मित्र समर खानसोबत मिळून दासला लुटण्याचा आणि त्याच्या हत्येचा कट रचला.

तिन्ही आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीने नवीन दासची हत्या केली. त्यांनी नवीनला त्याच्या गाडीत जिवंत जाळले. हा फक्त हत्येचा गुन्हा नसून यामध्ये अपहरण आणि लुटीचा सुद्धा समावेश आहे असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. दास आणि तय्यबमध्ये मागच्या दोन वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. समलैंगिकांच्या एका पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली होती.

मैत्री झाल्यानंतर दोघांनी दिल्लीमध्ये समलैंगिकांसाठी पार्टी आयोजित करायला सुरुवात केली. नवीन दास छत्तरपूर येथे आलिशान फ्लॅटमध्ये रहायचा तो तय्यबवर लिव्ह इन रिलेशनशिपसाठी दबाव टाकत होता. तय्यब ऐकत नसल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळे तय्यबने अखेर नवीन दासच्या हत्येचा कट रचला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:12 pm

Web Title: gay partner kills aap worker
Next Stories
1 नैसर्गिक आपत्तीत भारताचे २० वर्षांत ५.८ लाख कोटींचे नुकसान
2 धक्कादायक! ‘राक्षस’ सांगून कापली हाताची दहा बोटे
3 देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेला स्वयंघोषित गुरु रामपाल दोषी
Just Now!
X