25 September 2020

News Flash

२५ वर्ष छोट्या दीरासोबत पत्नीचे जुळलं प्रेम, नवऱ्याने दोघांचाही केला खून

पत्नी आणि भावाचे प्रेमसंबंध समल्यानंतर आरोपीने दोघांची हत्या केली .

बिहारमधील गयाजवळील इगुणी गावातील एक हत्याकांड समोर आले आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि भावाचाी निर्घून हत्या करून मृतदेह झाडाला बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वयाने २५ वर्ष छोट्या दीरासोबत त्या महिलेचे प्रेमसंबंध जुळले होते. ही बाब नलऱ्याला समजल्यानंतर त्याने पत्नी आणि भावाचा खून केला. या प्रकारामुळे गयामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचं नाव लालती देवी (वय ४५) तर पुरुषाचं नाव कुंदन उर्फ टेनी मांझी (२० वर्ष)आहे. लालती देवी ही कुंदनसोबत एका आठवड्यापूर्वी फरार झाली होती. पत्नी आणि भावाचे प्रेमसंबंध समल्यानंतर आरोपी टुली मांझी याने त्यांची हत्या केली. तसंच त्यांना संपवल्यानंतर दोघांचे मृतदेह झाडाला बांधले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती टुली मांझी आणि सासऱ्याला अटक केली आहे.

गुरूवरी आरोपी टुली मांझीच्या घरापासून जवळच असलेल्या शेतामध्ये एका युवक आणि महिलेचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. एकाच वेळी दोघांचे मृतदेह सापडल्याने गावांत खळबळ उडाली होती. घटनास्थळावर तात्कळ पोलस पोहचले. त्यांनी गुन्ह्याची नोदं करून कारवाईला सुरूवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 5:50 am

Web Title: gaya wife and her lover killed by a man for illicit relations nck 90
Next Stories
1 मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारला सल्ला, मंदीविरोधात लढण्यासाठी सांगितला सहा सूत्री कार्यक्रम
2 मोदी इस्रोसाठी अपशकुनीच; कुमारस्वामींची जीभ घसरली
3 बापरे…! ट्रक चालकाला ठोठावला तब्बल २,००,५०० रूपयांचा दंड
Just Now!
X