हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर डागलेल्या अग्निबाणांना प्रत्युत्तर देताना इस्रायलने शुक्रवारी पुन्हा एकदा गाझा पट्टी बॉम्बहल्ल्याने भाजून काढली़  
त्यात १० वर्षांच्या बालकाचा मृत्यूही झाला आह़े  त्यामुळे इस्रायल आणि हमासमधील शस्त्रसंधी कराराने तीन दिवसांपासून थंडावलेल्या तोफा पुन्हा आग ओकू लागल्या आहेत़  संघर्ष पुन्हा पेटल्यामुळे कैरो येथे कायमस्वरूपी शांततेसाठी सुरू असलेली चर्चा विफल ठरली आह़े
स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी आठ वाजता उभय पक्षांतील तात्पुरता शस्त्रसंधी करार संपुष्टात आला़  त्यानंतर सर्वात आधी हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर २१ अग्निबाण डागल़े  
त्याला कठोर प्रत्युत्तर देण्याचे आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी दिले आणि संघर्षांला सुरुवात झाली़  त्यामुळे घरी परतलेल्या हजारो पॅलेस्टिनी नागरिकांनी पुन्हा संयुक्त राष्ट्रांच्या शिबिरांमध्ये आश्रय घेतला़
इस्रायलच्या विमानांनी गाझा पट्टय़ात जोरदार बॉम्बवर्षांव केला़  येथील एका दग्र्यावर केलेल्या बॉम्बवर्षांवात दहा वर्षांचा एक मुलगा ठार झाला, तर अन्य पाच जण जखमी झाल़े
जसवंत सिंह कोमात