19 January 2018

News Flash

काँग्रेसच्या काळात ८ वेळा विकास दर ५.७ टक्क्यांच्या खाली; टीकाकारांना मोदींचे उत्तर

काही लोकांना निराशा पसरवण्याची सवय असते

नवी दिल्ली | Updated: October 4, 2017 7:38 PM

मोदींनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मुद्देसूदपणे काँग्रेस सरकारने शेवटच्या तीन वर्षांत आणि मोदी सरकारच्या पहिल्या तीन वर्षांत केलेल्या कामांमधील फरक दाखवून दिला.

काँग्रेसच्या काळात सहा वर्षात आठ वेळा विकास दर ५.७ टक्क्यांपर्यंत खाली आला होता, अशी आठवण करुन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. काही लोकांना निराशा पसरवण्याची सवय असते, अशा लोकांना लगेच ओळखणे गरजेचे असते, असे सांगत मोदींनी यशवंत सिन्हा आणि अरुण शौरींना टोला लगावला.

गेल्या काही दिवसांपासून ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर टीका होते आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. तर वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनीदेखील मोदी सरकारला खडे बोल सुनावत  ‘घरचा आहेर’ दिला. या टीकेवर मोदींनी बुधवारी उत्तर दिले.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय) सुवर्ण महोत्सवानिमित्त बुधवारी दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदी उपस्थित होते. आपल्या भाषणात मोदींनी सरकारने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. मोदींनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मुद्देसूदपणे काँग्रेस सरकारने शेवटच्या तीन वर्षांत आणि मोदी सरकारच्या पहिल्या तीन वर्षांत केलेल्या कामांमधील फरक दाखवून दिला. केंद्र सरकारने रस्ते आणि महामार्गांच्या निर्मितीमध्ये १ लाख ८३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. लोहमार्गांचा विकासही दुप्पटीने केला जात आहे. काँग्रेस सरकारने शेवटच्या तीन वर्षांत १, ३०० किमी रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण केले, मात्र आम्ही गेल्या ३ वर्षांत २, ६०० किमी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण केले, असे त्यांनी सांगितले.

सकल राष्ट्रीय उत्पादनातील रोकड व्यवहारांचे प्रमाण नोटाबंदीपूर्वी १२ टक्के होते. ते नोटाबंदीनंतर ९ टक्क्यांवर खाली आले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस भ्रष्टाचार मुक्ती दिन असून, काळ्या पैशांविरोधात सफाई मोहीम सुरु आहे. ‘हम लकीर के फकिर नही’, आम्हाला सर्व माहिती आहे, असे देखील आमचे म्हणणे नाही, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे देशात विकासाचे नवीन पर्व सुरु होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

काही मुठभर लोक देशाची प्रतिष्ठा आणि प्रामाणिक समाजव्यवस्थेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांविरोधात कारवाई सुरु केली असून, प्रामाणिक करदात्यांच्या हितांचे रक्षण केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

First Published on October 4, 2017 7:33 pm

Web Title: gdp growth dipped to 5 7 per cent 8 times during upa regime pm narendra modi hits back congress yashwant sinha
 1. M
  Manoj
  Oct 5, 2017 at 3:59 pm
  अरे नोटबंदी ने तुमचे सर्व ब्लॅक तुम्ही व्हाईट केले आणि विरोधकांचा ब्लॅक मनी खाल्ला .हे सर्वांना माहित आहे पण यात सामान्य लोकांचे , शेतकऱ्यांचे , GDP चे किती नुकसान झाले हे तुला माहित आहे काय ? किती छोटे उद्योग बंद पडले , नौकऱ्या गेल्या याचा हिशोब नाही ...तुम्हाला काय याचे ...तुमचे तर भले झाले ना ...चालुद्या ...तुम्ही आदिक लक्ष्य द्यावे व उपाय योजना कराव्यात म्हणून लोक तुम्हाला जागे करत आहेत ...ते निराशावादी नाहीत तर वास्तववादी आहेत पण हे समजण्याची तुमची क्षमता नाही. तुम्ही आपले नेहमी प्रमाणे हसत हसत अच्छे दिन चे गाजर दाखवा आणि भाषणबाजी करा ...हेच तुम्हाला जमते..
  Reply
  1. A
   ajay joshi
   Oct 5, 2017 at 2:59 am
   मान्य . एकदम मान्य आहे. पण मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला ? तुम्ही अच्छे दिन आणणार म्हणून तर लोकांनी तुम्हाला मते दिली होती. काँग्रेस शी तुलना करण्यासाठी नव्हती दिली. - अजय
   Reply
   1. K
    Kabir
    Oct 5, 2017 at 1:05 am
    त्यावेळी GDP मोजायची पद्धत वेगळी होती. तुलना करायची झाल्यास आजचा दर ३.४ वगैरे होईल. एवढा खाली कधी गेला होता का? किंवा येते या व्यक्तीची आता. त्याला सल्ले देणारे खरेच चुकीचे लोक आहेत.
    Reply
    1. V
     vivek
     Oct 5, 2017 at 12:29 am
     थोडा बेरोजगारी, कृषी, सिलेंडर दराचीसुद्धा तुलना करायची होती, gdp तुलना केलेले आकडे निव्वळ धूळपेक आहेत. बाकी मार्केटिंग मस्त केले. पण जनतेला नौटंकी हळूहळू कळत आहे
     Reply
     1. V
      vj
      Oct 5, 2017 at 12:09 am
      आपण लोकांनी ह्यांना निवडून आपल्याच पायावर चांगलाच धोंडा पडून घेतलाय आता रडून काय उपयोग
      Reply
      1. H
       harshad
       Oct 4, 2017 at 10:59 pm
       GDP खाली आला हे मान्य केले ते Kami Kay? नाहीतर GDP कमी आला हे देशासाठी चांगले आहे हे आपले नशीब
       Reply
       1. A
        Ajay
        Oct 4, 2017 at 10:01 pm
        As per UPA GDP formula current GDP rate is 3.7.......Your own Yshawant Sinha also highlighted it...
        Reply
        1. sushil Nagvekar
         Oct 4, 2017 at 9:46 pm
         तुम्हाला देशाचे पंत प्रधान न समजता देशाचे एक वरिष्ठ नागरिक समजून म्हणजेच सामान्य जनता प्रत्यके ज्येष्ठ नागरिका कडे एक पिता म्हणून बघून जसा बाप एका मुलाला कधीच खाईत लोटत नाही आणि वेळ पडते तेव्हा पाठीशी उभा राहतो असे समजून तुम्ही घेतलेलं निर्णय जनता म्हणजेच भावी पिढी यांच्या साठी कुठल्या हि प्रकारचा स्वार्थ नसलेले असतील असे समजतो.
         Reply
         1. Y
          yogesh
          Oct 4, 2017 at 9:32 pm
          मान्य कि दर ५.७ च्या खाली आला होता. त्याची शिक्षा त्यांना दिली जनतेने. प्रत्येक वेळी इतिहास उगाळून काय होईल. काही तर मान्य करा. मन कि बात करा
          Reply
          1. R
           RAMAN
           Oct 4, 2017 at 9:23 pm
           खोटं बोला पण रेटून बोला ....आता दिवस भरले मोदी सरकारचे
           Reply
           1. समीर देशमुख
            Oct 4, 2017 at 9:19 pm
            हा हा हा! इथ भांग पिऊन प्रतिक्रिया देणारा विक्षिप्त जल्पक रामदास भा'म'टे, आणि दत्ता सारखा मदरसाछाप, ओम, निशांत सारखे नमुने ज्यांना अर्थव्यवस्था काय असते ते पण नाही माहित, ते इथे देशी दारू पिऊन आल्यासारखे बरळत आहेत. अरे महामुर्खांनो, मोदीने अशा ठिकाणी प्रेझेंटेशन दिलय जिथून भावी अर्थतज्ज्ञ तयार होतात. ते काय तुमच्या पप्पू सारख फिरत अडाण्यांच्या मैफिलीत स्वतःची अक्कल दाखवत फिरत नाहीत. जर मोदी इथ काही खोट बोलला असता तर इथल्या लोकांनी त्यांना टोकले असते. पण सत्य कडु असते ते वर उल्लेख केलेल्या जल्पकांना न होत नाही. त्यामुळेच अशा लोकांच्या वाह्यात प्रतिक्रिया येतात.
            Reply
            1. D
             Datta
             Oct 4, 2017 at 9:02 pm
             महाशय 2014 विकासदर 9 टक्के होता तरीही तुम्ही घसा ताणून खोटा आणि विषारी प्रचार करीत होता. आता तुमचे जु े जनतेला कळले आहेत. नौटंकी बास आता सत्य स्वीकारा. खोटारडे कुठले.
             Reply
             1. उर्मिला.अशोक.शहा
              Oct 4, 2017 at 8:52 pm
              वंदे मातरम - मोदी सरकार च्या निर्णयावर उठ सुठ टीका करणारे त्यांना पाण्यातं पाहणारे ना मोदी नि चोख उत्तर दिले आहे काँग्रेस नेच ने ेल्या सी ए जी सिन्हा हे विसलब्लोअर झाले आहेत २०१४ च्या इलेक्शन पूर्वी अकरा घोटाळे काँग्रेस ने दाबून ठेवले त्यांना उघड होऊ दिले नाही असे सिन्हा म्हणाले आहेत मतदार जनता बघा चोरांची दुनिया कशी असते ती आता काँग्रेस ची पाळलेली मीडिया त्यांचा बचाव करण्याकरिता सरसावले पण लक्ष्यात ठेवा घोटाळे भ्रष्टाचार करून कोणीही लपू शकणार नाही पाताळात जरी गेला तरी त्याला बाहेर काढून गजा आड केल्या शिवार मोदी सरकार राहणार नाही म्हणून संबंधित तथाकथित राष्ट्रीय नेत्यांना धुग धुगी लागली आहे कि आता त्यांचा नंबर तर नाही ?????जा ग ते र हो
              Reply
              1. N
               nishant
               Oct 4, 2017 at 8:49 pm
               गप रे खोटारड्या....थापाड्या.
               Reply
               1. Ramdas Bhamare
                Oct 4, 2017 at 8:33 pm
                मित्रों , पिच मेरी बनाई हुई , स्टेडियम मेरा , प्रेक्षक मेरे भक्त ,स्टम्प मैं रखता नहीं , फील्डर मुझे अच्छे लगते नहीं, अम्पायर मैं रखता नहीं , मैच दिखाने वाले चैनल भी मेरे , तो ऐसे माहौल में बैटिंग करने में बड़ा मज़ा आता है !
                Reply
                1. O
                 om
                 Oct 4, 2017 at 8:21 pm
                 हेच तर एक्सपेक्टड होते, दुसरा काय ....ह्या ला अजून कालच नाही त्याला का निवडून दिल ते
                 Reply
                 1. Ramdas Bhamare
                  Oct 4, 2017 at 7:54 pm
                  हे महाशय पुन्हा सुरु झाले . श्रोते आपलेच , चॅनेलही आपलेच आणि वक्ता मी ! मग काय ? टाळ्या , टाळ्या आणि टाळ्या !!
                  Reply
                  1. D
                   deepak bansode
                   Oct 4, 2017 at 7:41 pm
                   Muddesud ...fek ... Mahngayee vishayee ... Petrol vishayee ... Uttar pradesh madhil balakanche sarkari hatyakand ya vishayee .. ani ho ... 5.7 ha tumchya sutranusar ... Congress kalatil sutra vaparal tar 3.7 hoto ....
                   Reply
                   1. Load More Comments