करोना विषाणुमुळे पसरलेल्या जागतिक महामारीविरूध्द लढण्यासाठी भारताने जो पुढाकार घेतला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. लसीकरणासंबंधीत तर भारताने सगळ्यांपेक्षा वेगळे आणि महत्त्वपूर्ण काम केले आहे. असे आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी सोमवारी सांगितले. त्या म्हाणाल्या की, साथीच्या आजाराशी लढा देण्यास भारत आघाडीवर आहे. कोविड -१९ लसींचे उत्पादन आणि अनेक देशांमध्ये त्या पोहचण्यामध्ये भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित हंसा मेहता व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी एका सत्रात श्रीमती गोपीनाथ यांनी ही प्रतिक्रिया दिली. गोपीनाथ यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कौतुक केले आणि म्हटले की ते नियमितपणे जगात सर्वाधिक वर्षात लस तयार करत आहेत. कोविड -१९ च्या लसींचे डोस तयार करून ते कोव्हॅक्सला देण्यात येतात आणि नंतर जगभरातील देशांमध्ये त्या वितरित केल्या जातात.

बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारसह अनेक शेजारी देशांना अनुदान देऊन तसेच व्यावसायिक व्यवस्थेतूनही लस देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद करून सांगितले की, “या साथीच्या आजाराशी लढण्यात भारत आघाडीवर आहे.”
कोविड-१९ मुळे जे जागतिक आरोग्य संकट निर्माण झालं आहे. त्याविरूध्द जगाला मदत करण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असे त्या म्हणाल्या.

जगतिक लसींचे केंद्र असलेल्या भारत विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोपीनाथ बोलत होत्या तसेच जागतिक आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी देशाच्या या भूमिकेचे योगदान काय आहे यावर ही त्यांनी प्रकाश टाकला.

या महामारीचा फटका भारताला फारच बसला आहे हे लक्षात घेऊन श्रीमती गोपीनाथ म्हणाल्या की, ज्या देशाची वाढ नेहमीच ६ टक्क्यांनी होतेय २०२० मध्ये त्या देशात ८ टक्के नकारात्मक वाढ झाली आहे.

श्रीमती गोपीनाथ यांनी उद्घाटन डॉ. हंसा मेहता व्याख्यानमालेला प्रमुख भाषण केले. डॉ. मेहता यांनी १९४७ ते १९४८ या काळात यूएन मानवाधिकार आयोगाच्या भारतीय प्रतिनिधी म्हणून काम केले.