जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी गुरुवारी अखेर लष्करप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला़  त्यांच्या नियुक्तीवरून अनेक दिवस वाद निर्माण झाला होता़  परंतु, अखेर त्यांनी १३ लाखांच्या विस्तीर्ण पायदळाचा कार्यभार मावळते लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांच्याकडून स्वीकारला़
साऊथ ब्लॉकच्या कार्यालयात बिक्रम सिंग यांनी सुहाग यांच्याकडे सूत्र सोपवली़  लष्कराच्या पायदळ, तोफदल आणि विमान भेदी शस्त्रात्रे आदीच्या आधुनिकीकरणाचे आव्हान असताना, तसेच लष्कर अनेक आघाडय़ांवरील युद्धासाठी स्वत:ला सिद्ध करीत असताना सुहान लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली आहेत़
५९ वर्षीय सुहाग हे गुरखा रेजिरेंटचे अधिकारी असून त्यांनी १९८७ सालच्या श्रीलंकेतील युद्धात भारतीय शांतीसैनिक म्हणून भाग घेतला आह़े