News Flash

वेळ पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करू, लष्करप्रमुख रावत यांचा इशारा

शांतता आणि स्थैर्य राखणे हेच आमचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले.

संग्रहित छायाचित्र

सर्जिकल स्ट्राइक ही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी करण्यात आली होती. वेळ पडल्यास भारतीय लष्कर ही कारवाई पुन्हा करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा इशारा भारताचे नवे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी एका मुलाखती दरम्यान दिला आहे. जर सीमेपलीकडील दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर या प्रकारची कारवाई नेहमी केली जाईल असे ते म्हणाले. लष्कराची भूमिका शांतता स्थापित करण्याची आहे परंतु जर कोणी कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा पूर्ण हक्क लष्कराला असल्याचे ते म्हणाले. जनरल रावत हे देशाचे २७ वे लष्करप्रमुख आहेत.

लष्कराचे मनोबल वाढवणे आणि प्रत्येक जवानाला सर्व अंगांनी सशक्त बनवणे याला माझे पहिले प्राधान्य राहील असे रावत म्हणाले.
त्यानंतर लष्कराला अत्याधुनिक साधन-सामुग्रीने ससज्ज करणे हे याकडे मी लक्ष देणार आहे असे रावत म्हणाले. त्यांना अत्याधुनिक हत्यारे आणि प्रगत तंत्रज्ञान प्रणाली देण्यात येईल जेणेकरुन ते आपल्या सीमेचे रक्षण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील असे रावत म्हणाले.

भारत युद्धासाठी ससज्ज आहे का असे विचारले असता ते म्हणाले की आम्ही नेहमीच युद्धासाठी तयार आहोत परंतु शांतता आणि स्थैर्य राखणे हेच आमचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले. युद्धाच्या काळात सीमेवर राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होते असे ते म्हणाले. बिपिन रावत हे मुळचे उत्तराखंड येथील आहेत. त्यांनी १ सप्टेंबर २०१६ रोजी लष्कराच्या उप प्रमुख पदाचा भार स्वीकारला होता. त्यांना डिसेंबर १९७८ मध्ये ११ गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनचे कमिशन प्राप्त झाले होते. त्यांनी डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमी (आयएमए) मधून पदवी मिळवली आहे. त्यांना ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ किताब प्राप्त झालेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 8:37 pm

Web Title: general bipin rawat army chief surgical strike pakistan india border
Next Stories
1 घरगुती सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरल्यास पाच रूपयांची सूट!
2 उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी अखिलेश यांना पसंती, मुलायमसिंहांनाही टाकले मागे
3 भुताटकीच्या चर्चेमुळे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे अतिथीगृहात रूपांतर!
Just Now!
X