15 December 2019

News Flash

छत्तीसगढ निवडणूक : नोटाबंदीचा त्रास सामान्यांना, ‘काळा पैसा’वाले मात्र फरार – राहुल गांधी

छत्तीसगढमध्ये १२ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दरम्यान, ९ ते १० नोव्हेंबर या दोन दिवसांत राहुल गांधी ५ प्रचार सभा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

छत्तीसगढ विधानसभेसाठीच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून (दि.९) सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज येथे प्रचार दौऱ्यावर आहेत. दरम्यान, नक्षलग्रस्त भागाचा आढावा घेत ते येथे प्रचार सभा घेत आहेत. एका सभेत बोलताना त्यांनी नोटाबंदीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला.


राहुल गांधी म्हणाले, नोटाबंदीदरम्यान सर्वसामान्यांनी लांबच लांब रांगांमध्ये थांबण्याचे कष्ट घेतले. मात्र, कोणीही काळा पैसा असणाऱ्यांना या रांगेमध्ये पाहिले नाही. नीरव मोदी, विजय मल्या, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी हे आपले पैसे घेऊन देशातूनच फरार झाले.

छत्तीसगढमध्ये १२ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दरम्यान, ९ ते १० नोव्हेंबर या दोन दिवसांत राहुल गांधी ५ प्रचार सभा घेऊन रोड शो ही करणार आहेत. प्रचार सभेच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी ते मुख्यमंत्री रमनसिंह यांचा मतदारसंघ असलेल्या राजनांदगाव येथे सभा घेणार आहेत.

दरम्यान, नोटाबंदीच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार टीका-टिपण्णी पहायला मिळाली. काँग्रेस दोन वर्षांपासून नोटाबंदीचा हा दिवस काळा दिवस म्हणून पाळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला हा निर्णय म्हणजे तुघलकी फतवा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

First Published on November 9, 2018 2:35 pm

Web Title: general people only get trouble from demonetization but having black money people fugitive from india says rahul gandhi during chhattisgarh election rally
Just Now!
X