News Flash

नरेंद्र मोदी-मर्केल यांची आज चर्चा

भारत व जर्मनी हे २००१ सालापासून महत्त्वाचे भागीदार आहेत.

नरेंद्र मोदी, Narendra Modi, लालबहादूर शास्त्री जयंती
लालबहादूर शास्त्रींच्या जयंती दिनी त्यांच्या समाधीस्थळावर उपस्थिती न लावल्याने मोदींवर टीका.

प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत व जर्मनीतील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल हे सोमवारी व्यापक चर्चा करणार असून त्यात व्यापार, सुरक्षा व संरक्षणविषयक संबंध वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. संरक्षण, शिक्षण, नविनीकरणीय ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान, कौशल्य विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, रेल्वे, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, नागरी विकास आणि कृषी या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर या बोलण्यांमध्ये भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. भारत व जर्मनी हे २००१ सालापासून महत्त्वाचे भागीदार आहेत. मोदी यांच्या जर्मनी दौऱ्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी मर्केल या तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2015 4:33 am

Web Title: german chancellor angela merkel arrives talks on monday
Next Stories
1 रसद पुरवठय़ासाठी चीनकडे वळण्याचा नेपाळचा इशारा
2 उत्तर प्रदेशात दूरचित्रवाणी पत्रकाराची गोळ्या घालून हत्या
3 बोस यांच्याबाबतची कागदपत्रे खुली करण्यास ब्रिटनला आणखी वेळ हवा!
Just Now!
X