युरोपीय संघटनेतील पोलादी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कंपन्यांना चांगलेच झापले. अभिव्यक्ति स्वातंत्र्य निश्चित करु शकत नाहीत, असा टोला मर्केल यांनी लगावला आहे. विचारांचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे आणि कोणत्याही किंमतीत त्याला बाधा पोहचता कामा नये. बोलण्याच्या स्वातंत्र्यावर कायदा किंवा काद्यामध्ये स्पष्ट केलेल्या भाषेनुसारच त्यावर निर्बंध घालता येतील. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्डोगन यांनी यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याची घोषणा केली आहे. नुकतीच व्हॉट्सअ‍ॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी म्हणजेच खासगी माहितीसंदर्भात धोरणामध्ये बदल केला. या नवीन धोरणांमधील अटी मान्य नसतील तर यूझरचे अकाऊंट डिलीट केलं जाईल असं व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन अटी आणि धोरणांसाठी मंजुरी दिल्यानंतर यूझर्सची संपूर्ण खासगी माहिती फेसबुकबरोबरच कंपनीच्या इतर फ्लॅटफॉर्मवर शेअर केली जाईल. मात्र यामुळे अनेक युझर्स आपल्या खासगी माहितीसंदर्भात चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर तसेच फेसबुक अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर जगभरामध्ये सोशल नेटवर्किंग साईटवरुन अभिव्यक्ती स्वतंत्र्यावर घाला घात जात असल्याचा आरोप होताना दिसत आहे. अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईटने ट्रम्प यांच्या अकाऊंटवर घातलेल्या बंदीचा विरोध केला आहे. मात्र काहींनी या बंदीचे समर्थन केलं आहे. भविष्यात होणारी हिंसा थांबवण्यासाठी ही बंदी योग्यच असल्याचं बंदीचं समर्थन करणाऱ्यांनी व्यक्त केलं होतं. दुसरीकडे व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी सेटींगवरुन चांगलाच वाद रंगला आहे. युझर्सची खासगी माहिती कंपन्यांच्या ताब्यात जाणार असल्याची टीका व्हॉट्सअ‍ॅपवर केली जात आहे.

आणखी वाचा- आत्मनिर्भर तुर्की; WhatsApp वर टाकला बहिष्कार, राष्ट्राध्यक्षांनीही सुरु केला ‘या’ ‘मेड इन तुर्की’ अ‍ॅपचा वापर

जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी वैचारिक स्वातंत्र्याला सर्वात आधी प्राधान्य दिलं पाहिजे. हे स्वातंत्र्य हा सर्वांचाचा मूलभूत अधिक असून त्या सोबत छेडछाड करता कामा नये. विचार स्वातंत्र्यावर केवळ कायद्याच्या माध्यमातून निर्बंध आणले जाऊ शकतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कोणत्याही व्यक्तीच्या अकाऊंटवर बंदी आणणे चुकीचे आहे असंही मर्केल यांनी म्हटल्याचं वृत्त एएफपीने दिलं आहे. अमेरिकेतील संसदेमध्ये म्हणजेच कॅपिटॉल इमारतीत सहा जानेवारी रोजी झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने नऊ जानेवारीपासून अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली होती. नंतर ट्विटरने जारी केलेल्या पत्रकामध्ये ट्रम्प यांचं अकाऊंट कायमचं बंद केलं जात असल्याचं सांगितलं.

आणखी वाचा- WhatsApp चं स्पष्टीकरण: मित्र-नातलगांसोबतची प्रायव्हेट चॅटिंग ‘सेफ’, बदल फक्त बिजनेस अकाउंटसाठी

अमेरिकन संसदेतील हिंसाचारानंतर फेसबुकनेही सात जानेवारीपासून ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केलं आहे. फेसबुकचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकेरबर्क यांनी ट्रम्प यांना काहीही पोस्ट करण्याची परवानगी देणं धोकादायक ठरु शकतं, असं म्हटलं होतं.