03 June 2020

News Flash

चीनमधून भारतात आलेली ‘ही’ कंपनी देणार १० हजार रोजगार

सुरूवातीला कंपनी ११० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक कंपन्या आपला चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मूळ भारतीय असलेल्या लावा या कंपनीनं चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता जर्मनीची बूट तयार करणारी कंपनी वॉन वेल्सनं आपला चीनमधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच लवकरच ही कंपनी भारतात आपला प्रकल्प सुरू करणार आहे. कंपनी आपला प्रकल्प उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सुरू करणार आहे. तसंच पहिल्या टप्प्यात कंपनी ११० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे १० हजारांपेक्षा अधिक जणांना रोजगार मिळणार आहे.

वॉन वेल्स ही कंपनी पुढील दोन वर्षांसाठी भारतात ११० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. तसंच आपल्या आग्रा येथील प्रकल्पातून दरवर्षी ३० लाख बूट तयार करण्यात येणार आहेत. ही कंपनी भारतात लॅक्टिक इंडस्ट्रिजसोबत एकत्र काम करणार आहे.

पहिल्या टप्प्यात ही कंपनी आग्र्यात प्रकल्प उभारणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात एमसिलरी युनिट उभारण्याचं काम करण्यात येणार आहे. याद्वारे कंपनीला रॉ मटेरिअल देण्यात येणार आहे. तसंच या युनिटमध्ये बूटांसाठी सोल, स्पेशल फॅब्रिक आणि केमिकल तयार केलं जाणार आहे.

प्रमिअम ब्रँडपैकी एक

वॉन वेल्स ही कंपनी जगभरात आपल्या फुटवेअर्ससाठी ओळखली जाते, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांकडून देण्यात आली. उत्पादनांचा वापर केल्यानं पाय, गुडघे आणि कंबरेच्या दुखण्यातून आराम मिळतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. वॉन वेल्सनं दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या उत्पादनांची विक्री ८० देशांमध्ये होते. तर १० लाखांपेक्षा अधिक लोक त्यांच्या उत्पादनांचा वापर करतात असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आगे. तसंच या कंपनीची ५०० पेक्षा अधिक रिटेल स्टोअर्स असून ऑनलाइन पोर्टलवरदेखील या उत्पादनांची विक्री करण्यात येत असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनमधून बाहेर पडून अन्य देशांमध्ये आपला व्यवसाय हलवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक मोबाईल कंपन्या आणि ईलेक्ट्रीक कंपोनंट तयार करणाऱ्या कंपन्याही भारतात येण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 4:15 pm

Web Title: german footware company von wellx 110 crores investment india 10 thousand jobs coronavirus jud 87
Next Stories
1 “ही क्रूर थट्टा” : काँग्रेस आमदाराकडून प्रियांका गांधींना घरचा आहेर, योगींच कौतुक
2 फेसबुक शॉप्स; छोट्या विक्रेत्यांनाही करता येणार वस्तुंची ऑनलाईन विक्री
3 “ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा पाळीव कुत्रा;” चीनचा तोल सुटला
Just Now!
X