News Flash

जर्मन नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी एक जण अटकेत

मी फक्त 'वेलकम टू इंडिया' इतकंच त्या जर्मन नागरिकाला म्हणालो होतो

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे स्वीस दाम्पत्याला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सोनभद्र येथे एका जर्मन नागरिकाला मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. (छायाचित्र: एएनआय)

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे स्वीस दाम्पत्याला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सोनभद्र येथे एका जर्मन नागरिकाला मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना सोनभ्रद रेल्वे स्थानकावर घडली. पोलिसांनी अमन यादव नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. यादवने या जर्मन नागरिकाला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, संशयित अमन यादव याने आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. मी जर्मन नागरिकाला ‘वेलकम टू इंडिया’ इतकंच म्हटलं. यावर त्याने मला ठोसा लगावला. इतकंच नव्हे तर तो माझ्यावर थुंकलाही, असा आरोप यादवने केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2017 9:32 am

Web Title: german national beaten up at sonbhadra railway station one arrested
Next Stories
1 राहुल गांधींना ‘जीएसटी’ अजून समजलाच नाही, अरूण जेटलींचा टोला
2 तब्बल ९१८ किलोची खिचडी गिनेस बुकमध्ये
3 ‘प्रत्येक लष्कराला संघर्षांसाठी तयार राहावेच लागते’
Just Now!
X