05 March 2021

News Flash

सुपर ३० अकादमीस जर्मनीच्या प्रतिनिधींची भेट

.बिहार विधानसभेच्या निवडणुका जाणून घेण्यासाठी आले असता या अधिकाऱ्यांनी आनंदकुमार यांच्या अकादमीला भेट दिली.

गरीब पण हुशार मुलांना आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात मदत करणाऱ्या सुपर ३० अकादमीला फ्रान्स व जर्मनीच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी भेट दिली. ही अकादमी गणितज्ञ आनंदकुमार चालवतात. कोलकात्यातील फ्रान्सचे वाणिज्य दूत डॅमियन सय्यद व नवी दिल्लीतील उपवाणिज्यदूत बेंजामिन वेझ तसेत जर्मनीच्या दूतावासाचे राजकीय सल्लागार ख्रिस्तीयन व्ॉगनर यांनी सुपर ३० अकादमीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली.बिहार विधानसभेच्या निवडणुका जाणून घेण्यासाठी आले असता या अधिकाऱ्यांनी आनंदकुमार यांच्या अकादमीला भेट दिली. आनंदकुमार अतिशय चांगले काम करीत आहेत असे डॅमियन सय्यद यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2015 12:07 am

Web Title: german visits 30 academy
Next Stories
1 ‘मोदींच्या नावावर पंचायत निवडणूकही लढवतील’
2 अंकारामध्ये रेल्वे स्टेशनजवळ आत्मघातकी हल्ला; २० जण ठार
3 गुलाम अलींचा दिल्लीतील कार्यक्रमही उधळून लावण्याचा शिवसेनेचा इशारा
Just Now!
X