जर्मनीतील हॅम्बर्गमधील सुपरमार्केटमध्ये हल्लेखोराने केलेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या हल्ल्यात सुपरमार्केटमध्ये खरेदीसाठी आलेले अनेक जण जखमी झाले असून चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

उत्तर जर्मनीतील हॅम्बर्गमध्ये सुपरमार्केट असून या सुपरमार्केटमध्ये शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी तीनच्या सुमारास हल्लेखोराने प्रवेश केला. हल्लेखोराने सुपरमार्केटमध्ये येताच ग्राहकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. यातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.

australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Anthony Albanese
सिडनीतील हल्लेखोराची ओळख पटवण्यात यश
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

सुरुवातीला दोन हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे वृत्त होते. मात्र पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावले. हा हल्ला एकाच हल्लेखोराने केल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी मात्र यावर अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. ‘आम्हाला या हल्ल्यातील जखमींचा नेमका आकडा आणि हल्ल्याचा उद्देश याविषयी ठोस माहिती मिळालेली नाही’ असे पोलिसांनी ट्विटरवरुन स्पष्ट केले. हल्ल्यानंतर हल्लेखोराने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षदर्शींनी धाडस दाखवत त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.