जर्मनीमधील म्युन्स्टर शहरातील गजबजलेल्या परिसरात बेदरकारपणे कार घुसवल्याने तीन जण ठार झाले तर, ३० हून अधिक जखमी झाले. या घटनेनंतर कारच्या चालकाने स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केली. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी त्यास दुजोरा दिलेला नाही.
वेगवान कार अचानक गर्दीत घुसल्याने लोकांचा गोंधळ उडाला. नेमके काय झाले हे समजण्याआधीच कारने अनेकांना धडक दिली. त्यामुळे पादचारी जखमी झाले, असे म्युन्स्टर पोलीस प्रवक्त्याने स्पष्ट केले. यापूर्वीही जर्मनीत असा हल्ला झाला असल्याने म्युन्स्टरमधील घटनाही दहशतवादी हल्ला असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कारचालकाने स्वतवर गोळी झाडून घेतल्याने तसायंत्रणांपुढे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांत जर्मनीला दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. २०१६ मध्ये टय़ुनिशियन व्यक्तीने बर्लिनमध्ये भरबाजारात ट्रक घुसवला होता. त्यात १२ जणांना जीव गमवावा लागला. या हल्ल्याची जबाबदारी ‘आयसिस’ने घेतली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2018 3:23 am