News Flash

स्थलांतरितांसाठी जर्मनी ६ अब्ज युरो उपलब्ध करणार

जर्मनीने इराक व सीरियातून येणाऱ्या स्थलांतरितांना खुला प्रवेश देण्याचे ठरवले.

जर्मनीने इराक व सीरियातून येणाऱ्या स्थलांतरितांना खुला प्रवेश देण्याचे ठरवले असून, त्यांच्यासाठी ६ अब्ज युरो (६.७ अब्ज डॉलर्स) इतका निधी येत्या वर्षभरात उपलब्ध करून दिला जाणार आहे. स्थलांतरितांची काळजी घेण्यासाठी हा निधी देण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षाने घेतला आहे.
संघराज्य सरकारने सध्याच्या स्थलांतरितांच्या मुद्दय़ामुळे २०१६चा अर्थसंकल्प ३ अब्ज युरोने वाढवण्याचे ठरवले आहे. राज्य सरकार व स्थानिक प्रशासन आणखी ३ अब्ज युरो उपलब्ध करणार आहे. प्रादेशिक पक्षांशी याबाबत २४ सप्टेंबरला करार केला जाणार आहे. गेले काही आठवडे व महिने जर्मनी हे स्थलांतरितांचे आश्रयस्थान ठरले आहे. सरकारने स्थलांतरितांबाबत दाखवल्या जाणाऱ्या सहवेदनेविषयी प्रशंसा केली असून, या लोकांना सामावून घेण्यामुळे निर्माण होणारी आव्हाने आर्थिक सामर्थ्यांवर पेलली जातील असे म्हटले आहे. जर्मनी हा युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश असून, दुसऱ्या महायुद्धानंतर तेथे प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने निर्वासित येत आहेत. एकूण आठ लाख निर्वासित येणे अपेक्षित असून, ही संख्या गेल्या वर्षीच्या चार पट असेल. त्यासाठी १० अब्ज युरो खर्च येणार आहे. या आठवडाअखेरीस बावरिया ओलांडून १७ हजार स्थलांतरित येण्याची शक्यता आहे. जर्मनीत काही प्रमाणात स्थलांतरितांविरोधात निषेध मेळावे झाले असून काही ठिकाणी हल्ले झाले आहेत. विशेष करून पूर्व जर्मनीत हे घडत आहे.

इसिसवर पाळतीसाठी फ्रान्स टेहळणी विमाने पाठवणार
पॅरिस- सीरियातील इस्लामिक स्टेट दहशतवादी गटांच्या ठिकाणांवर फ्रान्स उद्यापासून टेहळणी विमाने पाठवेल, असे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉईस ओलांदे यांनी सोमवारी सांगितले. उद्यापासून आपली टेहळणी विमाने सीरियाच्या हवाई क्षेत्रावर पाठवली जाऊ शकतात, जेणेकरून आपल्याला दाएशविरुद्ध (इस्लामिक स्टेट गट) हवाई हल्ल्यांची आखणी करता येईल, असे मी संरक्षण मंत्रालयाला सांगितले आहे, असे ओलांदे यांनी पॅरिसमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. फ्रान्स सीरियाच्या भूमीत सैन्य पाठवणार नाही, कारण तसे करणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 1:20 am

Web Title: germany to make extra 6 billion euros available for refugees
Next Stories
1 किशोरवयीन मुलांच्या कादंबरीवर न्यूझीलंडमध्ये बंदी
2 ‘यांत्रिक बाहू’ बनवण्यासाठी नासाचा प्रकल्प
3 सतत बावीस दिवस ऑनलाइन गेम खेळणाऱ्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू ; रशियातील घटना
Just Now!
X