18 January 2018

News Flash

गुजरातमध्ये लघुशंका करण्यासाठी मिळणार एक रूपया!

लोकांना स्वच्छतागृहात जाऊन लघवी करण्याची सवय लागावी यासाठी गुजरातमध्ये प्रशासनातर्फे एक अनोखा उपाय अमलात आणला जाणार आहे.

वृत्तसेवा, अहमदाबाद | Updated: June 5, 2015 6:44 AM

लोकांना स्वच्छतागृहात जाऊन लघुशंका करण्याची सवय लागावी यासाठी गुजरातमध्ये प्रशासनातर्फे एक अनोखा उपाय अमलात आणला जाणार आहे. एरवी अनेक लोक रस्त्याच्या कडेला अथवा आडोशाला लघुशंका करताना दिसतात. यावर उपाय म्हणून अहमदाबाद महानगरपालिकेने जवळच्या स्वच्छतागृहात जाऊन लघुशंका करणाऱ्याला एक रूपयाचे बक्षीस देण्याचे ठरवले आहे. यापूर्वी नेपाळमधील काठमांडू येथे अशाप्रकारची प्रयोग करण्यात आला होता आणि तो कमालीचा यशस्वीही ठरला होता. त्यामुळेच अहमदाबाद महानगरपालिकेने शहराच्या काही भागांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने शहरातील ६७ ठिकाणे निश्चित केली आहेत. स्वच्छतेच्यादृष्टीने कुप्रसिद्ध असणाऱ्या या ठिकाणांजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. या मोहीमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा, यासाठी पालिका प्रयत्नशील असेल. ही योजना यशस्वी झाल्यास संपूर्ण अहमदाबाद शहरात ती राबविण्याचा पालिकेचा मानस आहे.
सार्वजनिक मुतारी/शौचालयांचा वापर व्हावा, जेणेकरून अस्वच्छता पसरणार नाही. तसेच शहर राखण्यासाठी हा प्रयोग राबवत असल्याची माहिती महापालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या स्वच्छतगृहांतील जाहिरातींद्वारे निधी जमा केला जाईल आणि तो या स्वच्छतागृहाचा वापर करणाऱ्यांना प्रत्येकी एक रुपये याप्रमाणे दिला जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अहमदाबादेत सुमारे ३०० सार्वजनिक शौचालये आहेत. यापैकी ६७ शौचालयात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यातील बहुतेक शौचालये ही झोपड्यांच्या परिसरातील आहेत.

First Published on June 5, 2015 6:44 am

Web Title: get a rupee for a pee in ahmedabad
 1. V
  Vachak
  Jun 5, 2015 at 7:53 pm
  आणि लघुशंका केल्यावर पुरेसे पाणी टाकायचीही व्यवस्था असायला हवी. नाहीतर आपल्याकडे सार्वजनिक मुतारी आणि संडासात मुद्दामहून पाणी न टाकण्याची प्रवृत्ती आढळून येते. असतात काही घाणेरडी माणस.
  Reply
  1. N
   narayan bhamare
   Jun 5, 2015 at 7:43 pm
   कल्पना सुरेख आहे ,त्यासाठी चौका चोकात स्वच्छतागृह उभारावी जेणे करून उघड्यावर कुणीही लघुशंका करणार नाही .आणि परिसरात अस्वच्छता पसरणार नाही .
   Reply
   1. N
    narayan bhamare
    Jun 7, 2015 at 3:40 pm
    तुझ्या जातीच काही विचारू नकोस जिथ चांगल मिळेल तिथ घुसणारी तुझी जात आहे .त्या पेक्षा जय भीमवाले बरे नाही खूपच चांगले त्यांना तरी लाज शरम आहे तीहि नाही तुझ्या जातीत ,तू दुसरर्याच्या जातीवर गेलास हि तुझी खरी नियत आहे.लेका
    Reply
    1. P
     Prasad
     Jun 5, 2015 at 7:13 pm
     वा. महाराषःट्रातही उघड्यावर 'बसणार्या'साठी काही तरी उपाय शोधून काढावेत.
     Reply
     1. R
      RJ
      Jun 6, 2015 at 6:05 am
      आईये मेहरबा ...?
      Reply
      1. S
       Shriram
       Jun 5, 2015 at 6:47 pm
       रस्त्यावर लघवी करणार्यांना १०० रुपये दंड करून त्यातून हा उत्तेजनार्थ एक रुपया द्यावा.
       Reply
       1. S
        suresh
        Jun 6, 2015 at 6:23 am
        कल्पना चांगली आहे पण लघुशंका झाली/केली कि नाही हे पण तपासले पाहिजे/व्यवस्था करावी नाहीतर काहीजण नुसते आत जावून येतील आणि एक रुपया घेवून जाण्याचा धंदा करतील !!
        Reply
        1. Vikas Salvi
         Jun 6, 2015 at 2:52 am
         पाणी टाकायची लोंकाना सवय नसल्याने ती व्यवस्था automatic असावी. मोदी म्हणतात मुताऱ्या वापरा गडकरी म्हणतात झाडांना उपयुक्त (नाक बंद) कुणाचे ekay ऐकायचे!!!
         Reply
         1. Load More Comments