हजारो वर्षांपासून अस्तित्व असलेल्या पाकृत ‘महाराष्ट्री’ भाषा अर्थात मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांनी लोकसभेत केली. येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनापूर्वी त्यासंबंधी घोषणा करण्याची मागणी त्यांनी शून्य प्रहरात केली. मराठीतून भाषण करताना त्यांनी अनेक ऐतिहासिक संदर्भाचा दाखला दिला.
धनंजय महाडिक यांनी पंचायत सक्षमीकरणावर सरकारला प्रश्न उपस्थित केला.  पंचायत राज योजनेंतर्गत पाच हजार वस्तीच्या गावासाठी एक अभियंता नियुक्त केला जातो.अभियंता पदांची संख्या वाढविण्याची मागणी त्यांनी केली.
सबलीकरण योजनेचे काय?
विदर्भ व मराठवाडय़ातील महिला शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची सबलीकरण योजना आहे का, असा प्रश्न हिंगोलीच्या राजीव सातव यांनी विचारला. त्यावर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील महिला किसान सशक्तीकरण योजनेची आकडेवारीच केंद्रीय मंत्री चौधरी बीरेंद्र सिंह यांनी सादर केली. त्याने सातव यांचे समधान झाले नाही.