मुलींबाबत सापत्नभाव संपवून त्यांना सर्व क्षेत्रात चमकण्याची समान संधी मिळायला हवी, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.
मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, राष्ट्रीय कन्यादिनी आपण मुलींनी केलेल्या अतुलनीय कार्याला सलाम करतो. त्यांनी देशाच्या उभारणीत दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. मुलींबाबतचा सापत्नभाव बंद करायला पाहिजे, आपल्या मुलींना सर्व क्षेत्रात चमकण्याची समान संधी मिळायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले.
दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी बेटी बचाव, बेटी पढाव (मुली वाचवा, मुलींना शिकवा) योजना लागू केली असून मुलींबाबतचा सापत्नभाव म्हणजे समाजाच्या आजारी मानसिकतेचे लक्षण आहे असे म्हटले आहे.

मुलींबाबतचा सापत्नभाव हा अठराव्या शतकातील मानसिकतेपेक्षा वाईट असून देशाच्या भविष्यकाळासाठी ही वाईट बाब आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले होते.