News Flash

बायकोवर अनैतिक संबंधांचा संशय, नवऱ्याने संपवलं कुटुंब

पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत या संशयातून पतीने तिच्यासह संपूर्ण कुटुंबाला संपवले.

प्रतिनिधिक छायाचित्र

पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत या संशयातून पतीने तिच्यासह संपूर्ण कुटुंबाला संपवले. उत्तर प्रदेशच्या गाझियबाद शहरातील शताब्दी नगरमध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. पतीने पत्नीसह तीन मुलांना विष पाजून मारले. कुटुंबाला संपवल्यानंतर प्रदीपने (३७) स्वत: आत्महत्या करुन जीवन संपवले. सकाळी ५.४० च्या सुमारास पोलिसांना या घटनेबद्दल कळवण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. प्रदीपला दारुचे व्यसन होते. पत्नीवर तो सतत संशय घ्यायचा. पत्नीचे दुसऱ्या माणसासोबत प्रेमप्रकरण सुरु असल्याचा त्याच्या मनात संशय होता अशी माहिती पोलिसांनी दिली. शताब्दी पुरम भागातील मसुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

पोलिसांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात प्रदीपने आपण इतके टोकाचे पाऊल का उचलत आहोत त्याविषयी खुलासा केला आहे. प्रदीप आणि त्याच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. पत्नी आणि तिसऱ्या मुलाची प्रकृती गंभीर होती. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्या दोघांचा मृत्यू झाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 3:07 pm

Web Title: ghaziabad man kills wife suspicion of having affair poisons 3 kids commits suicide dmp 82
Next Stories
1 ‘नारी तू नारायणी’ हे जर देशाने लक्षात घेतलं तर महिलांविरोधातली हिंसा थांबेल
2 गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या हत्याप्रकरणी ७ जणांना जन्मठेप
3 देशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा अर्थसंकल्प-मोदी
Just Now!
X