News Flash

गुलाम अहमद मीर यांची नजरकैद बेकायदेशीर – पी. चिदंबरम

कोणतेही लेखी आदेश नसताना ताब्यात घेतल्याचा आरोप

(संग्रहित छायाचित्र)

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने सकारवर टीका केली जात आहे. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी देखील जम्मू-काश्मीर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुलाम अहमद यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे.

चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले की, गुलाम अहमद मीर शुक्रवारपासून नजरकैदेत आहेत, ही कारवाई बेकायदेशीर आहे. सरकारचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांना ताब्यात घेण्याचे कोणतेही लेखी आदेश नव्हते. कायदेशीर आदेशाशिवाय नागरिकांना एक क्षणासाठी देखील त्यांच्या स्वांतत्र्यापासून वंचित ठेवण्याचा सरकारला कोणताच अधिकार नाही.  तसेच त्यांनी हे देखील सांगितले की, मी आशा करतो की, आता न्यायालयच नागरिकांच्या स्वातंत्र्याबाबत योग्य तो निर्णय घेईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 5:48 pm

Web Title: ghulam ahmeds detention illegal msr 87
Next Stories
1 दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग
2 UAPA कायद्यातील दुरूस्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
3 लडाख हा भारताचा अंतर्गत भाग, शेजाऱ्यांना अडचण असेल तर…
Just Now!
X