काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ १५ फेब्रुवारीला संपत आहेत. त्यानिमित्ताने आज त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधानांसह सभागृहातील सदस्यांनी आझादांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर आझाद यांनी समारोपाचं भाषण केलं. यावेळी बोलताना आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेसह पाच कठीण प्रसंग सांगितले. हे सांगत असताना आझाद यांचा कंठ दाटून आला होता.

आणखी वाचा- मुस्लिम एकमेकांशी लढून संपत आहेत, तिथे तर हिंदू नाहीत; गुलाम नबी आझाद यांचा सवाल

गुलाम नबी आझाद समारोपाच्या भाषणात बोलताना म्हणाले,”मी माझ्या आईवडिलांच्या निधनानंतरही असं रडलो नव्हतो, अशा पाच घटना माझ्या आयुष्यात घडल्या आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी आणि राजीव गांधी यांचं निधन झालं. या तिन्ही प्रसंगात हमसून हमसून रडलो होतो. तिघांचाही मृत्यू अचानक झाल्यानं प्रचंड दुःख झालं होतं,” असं आझाद म्हणाले.

आणखी वाचा- आझाद यांना वाशिममधून पाडायचं ठरवलं, पण…; शरद पवारांनी सांगितला १९८२चा किस्सा

“माझे आई-वडील गेले तेव्हा माझ्या डोळ्यातून फक्त आसू येत होते. ओडिशात असताना चौथ्यांदा मी ओक्साबोक्सी रडलो. मी माझ्या वडिलांना रुग्णालयात घेऊन गेलो होतो. त्यांना कॅन्सर होता. डॉक्टरांनी मला २१ दिवस कुठेही न जाण्यास सांगितलं होतं. पण अचानक सोनिया गांधी यांचा एका सायंकाळी फोन आला. त्यांनी मला ओडिशाला जायला सांगितलं. मी वडिलांना सोडून ओडिशात गेलो. जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा शेकडो मृतदेह समुद्राच्या पाण्यावर तरंगत होते. ते पाहून मला रडू आवरलं नाही. मी खूप रडलो,” असं आझाद यांनी सभागृहात सांगितलं.

आणखी वाचा- निरोपच्या भाषणात आठवलेंनी दिलेली ‘ती’ ऑफर ऐकून गुलाम नबी आझाद यांना हसू अनावर

“पर्यटन बसमधून गुजरातचे काही लोक आलेले होते. त्या बसवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. अनेका माणसं मारली गेली. जेव्हा विमानतळावर गेलो, तेव्हा छोटी छोटी मुलं रडत होती. त्यांनी माझे धरले, तेव्हा माझ्या तोंडून आवाज निघाला, ‘ऐ खुदा तुने ये क्या किया’, या मुलांना मी काय उत्तर देऊ, त्या बहिणींना काय उत्तर देऊ ज्या इथे फिरण्यासाठी आल्या होत्या आणि आज मी त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुबियांना पाठवत आहे.” हा प्रसंग सांगताना आझाद यांचे डोळे भरून आले होते.