News Flash

करोना : ‘या’ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळाली लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश

ही लसीकरण मोहीम यशस्वी झाल्याने इतर देशांचाही आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार

(फोटो सौजन्य : रॉयटर्स आणि विकिपिडियावरुन साभार)

जगभरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र या संकटाच्या काळामध्ये जिब्राल्टर नावाच्या छोट्याश्या देशाने कमाल करुन दाखवलीय. आपल्या देशातील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्याचा पराक्रम या देशाने केलाय. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार बुधावारी या देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचे दोन डोस देण्यात आल्याचं हॅनकॉक यांनी स्पष्ट केलं आहे.

जिब्राल्टरची लोकसंख्या केवळ ३४ हजारांच्या आसपास आहे. या ठिकाणी चार हजार २६३ करोनाचे रुग्ण आढळून आले होते. देशातील ९४ जणांना करोना संसर्गामुळे मृत्यू झालाय. हॅनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यासंदर्भात माहिती देताना, “मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होत आहे की काल (बुधवारी) जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला आहे ज्या आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे,” असं सांगितलं. या संकटाच्या प्रसंगी जिब्राल्टरच्या नागरिकांनी दाखवलेला संयम आणि साहसाचं मी कौतुक करतो, असं म्हणत हॅनकॉक यांनी जिब्राल्टरच्या नागरिकांचं कौतुक केलं.

फोटो सौजन्य: रॉयटर्स

पुढे बोलताना हॅनकॉक यांनी, “ब्रिटीश देशांच्या समुहामध्ये असणाऱ्या या देशातील लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबवण्यामध्ये सर्व देशांमधील सहकार्य मोलाचं ठरलं,” असंही सांगितलं. जिब्राल्टरचे प्रमुख फॅबियन पिकार्डो यांनी लसीकरणासाठी यूनायटेड किंग्डम सरकारचे आभार मानले. पीपीई कीट, लसी आणि चाचण्यांसाठी लागणारी सर्व आर्थिक मदत ब्रिटनने आम्हाला केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असं पिकार्डो म्हणाले. जिब्राल्टरमध्ये सध्या करोनाचे २६ रुग्ण असले तरी त्यापैकी १० जण परदेशी आहेत. जिब्राल्टर हा स्वतंत्र देश असला तरी त्यावर ब्रिटनचं नियंत्रण असल्याने येथील लसीकरणासाठी ब्रिटननेच मदत केलीय.

जिब्राल्टरमधील ही लसीकरण मोहीम यशस्वी झाल्याने इतर देशांचाही आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. स्पेन आणि इतर युरोपीयन देशांमध्ये एस्ट्राजेनेकाच्या लसीसंदर्भात वेगवेगळे दावे केले जात असतानाच जिब्राल्टरमधून आलेली ही बातमी दिलासा देणारी आहे. युरोपियन महासंघाची औषध नियामक संघटना असणाऱ्या युरोपियन मेडिसिन एजन्सीने एस्ट्राजेनेका ही करोना लस सुरक्षित असल्याचा खुलासा केला आहे. त्यानंतर इटली, फ्रान्स आणि इतर देशांनाही ही लस वापरण्यास सुरुवात केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 6:21 pm

Web Title: gibraltar becomes the first nation in the world to vaccinate entire adult population scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 टीएमसीचे निवडणूक आयोगाला निवेदन; मतदान केंद्रावर केवळ केंद्रीय सैन्य तैनात करण्याच्या निर्णयाला मागे घेण्याचा आग्रह
2 फ्रान्स : करोनाची तिसरी लाट आल्याने एक महिन्याचा लॉकडाउन जाहीर; राष्ट्राध्यक्षांवर राजकीय संकटाची टांगती तलवार
3 असदुद्दीन ओवैसींना झटका; बंगालची जबाबदारी असलेल्या नेत्याने दिला ममतांना पाठिंबा
Just Now!
X