News Flash

टिपूवरील विधानावरून गिरीश कर्नाड यांचा माफीनामा

कर्नाड यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार होत होता.

गिरीश कर्नाड

बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहराचे संस्थापक केम्पेगौडा यांच्याऐवजी म्हैसूरचा सत्ताधीश टिपू सुलतान याचे नाव देण्यात यावे, या आपल्या विधानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक गिरीश कर्नाड यांनी बुधवारी जाहीर माफी मागितली. असे विधान करून मला काय फायदा मिळणार आहे. या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची जाहीर माफी मागतो, असे कर्नाड म्हणाले.

कर्नाड यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार होत होता. यावर कर्नाड यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मी फक्त व्यक्तिगत व्यक्त केले होते. त्यात कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. टिपू सुलतानच्या जयंती कार्यक्रमाला झालेल्या विरोधावरून गिरीश कर्नाड यांनी टिपू हा हिंदू शासनकर्ता असता तर त्याला शिवाजी महाराजांच्या इतकाच आदर प्राप्त झाला असता, असे विधान केले होते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:57 am

Web Title: girish karnad offers apology
Next Stories
1 सीमेवरील जवानांमुळेच देशाला जगात आदराचे स्थान- मोदी
2 सुवर्ण मंदिरात धरपकड
3 हॉटलाइनवर मोदी- ओबामा संवाद
Just Now!
X