News Flash

मदरसा मुख्याध्यापकांनी युवतीला जाळले

या प्रकरणी एकूण १७ जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सिराज यांचा समावेश आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

ढाका : मदरशाच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध तक्रार केल्याबद्दल एका तरुण  मुलीस या मुख्याध्यापकांनी जाळल्याची धक्कादायक घटना बांगलादेशात घडली आहे. या प्रकाराविरुद्ध देशभरात संतापाची लाट उसळली असून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.

मुख्याध्यापक सिराज-उद-दौला यांनी नसरत जहान रफी (१८) हिला आपल्या कार्यालयात बोलाविले आणि तिला अयोग्य प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. याबाबत नसरत हिने तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांनी बुरखा परिधान केलेल्या चार हल्लेखोरांनी ६ एप्रिल रोजी नसरत हिला मदरशामध्येच पेटविले. या प्रकरणी एकूण १७ जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सिराज यांचा समावेश आहे.

नसरत १० एप्रिल रोजी मरण पावली, त्यानंतर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि जोरदार निदर्शने करण्यात आली.गुरुवारी जनतेने मानवी साखळीचे आयोजन केले होते. सिराज याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने कारागृहातूनच ही हत्या घडवून आणली, असे वृत्त बीडीन्यूज २४ डॉट कॉम या ऑनलाइन न्यूज पोर्टलने पोलिसांच्या हवाल्याने दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 4:33 am

Web Title: girl burnt alive at madrasa for reporting sexual harassment in bangladesh
Next Stories
1 मैदानातील सापांच्या भीतीवर ‘मॅट’चा उतारा
2 शिवसेनेची दुसरी फळी मराठवाडय़ापासून दूर
3 भाजपकडून दगाफटका होण्याची शिवसेनेला धास्ती?
Just Now!
X