News Flash

फेसबुकवर बॉयफ्रेंडसमोरच तरुणीची लाईव्ह आत्महत्या

आपल्या बॉयफ्रेंडला भेटल्यानंतर तरुणी प्रचंड रागात होती आणि याच रागात तिने हे टोकाचं पाऊल उचललं

(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगालमधील एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी तरुणी फेसबुकवर लाईव्ह चॅट करत होती. लाईव्ह चॅट सुरु असतानाच तरुणीने गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलं. ही सर्व घटना फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय तरुणी सोनारपूरच्या बयेदेपरा परिसरातील रहिवासी आहे. तरुणीने फेसबुवक लाईव्हदरम्यानच आत्महत्या केली असून यावेळी ती एका व्यक्तीसोबत चॅट करत होती. चॅट करणारी व्यक्ती तिचा बॉयफ्रेंड असल्याची माहिती मिळत आहे.

शनिवारी आपल्या बॉयफ्रेंडला भेटल्यानंतर तरुणी प्रचंड रागात होती. घरी परतल्यानंतरही तिचा राग कायम होता. तिच्या बॉयफ्रेडने तिला फोनही केला होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे. घरी आली तेव्हा ती कोणाशीच काही बोलत नव्हती. शांत बसून राहिली होती अशी माहिती तिच्या आईने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

तरुणीची आई जवळच्याच रुग्णालयात मोलकरीण म्हणून काम करते. शनिवारी ६.३० वाजता त्यांनी घर सोडलं होतं. वडिल आणि भाऊदेखील घराबाहेर गेले असल्या कारणाने घरात तरुणी एकटी होती. रविवारी सकाळी ८ वाजले तरीही मुलगी रुमच्या बाहेर न आल्याने तिच्या आईला संशय आला. आत जाऊन पाहिलं असता मुलीने गळफास लावून घेतला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी तपास सुरु केला असता हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी तरुणीने फेसबुक लाईव्ह केलं असल्याचं समोर आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 8:04 am

Web Title: girl commits suicide facebook live kolkata
Next Stories
1 Donald Trump Kim Jong Un summit : डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली किम जोंग यांची भेट
2 Pulwama terrorist attack: पुलवामामध्ये कोर्टाच्या आवारात दहशतवादी हल्ला; दोन पोलीस शहीद
3 तीन वर्षांच्या मुलीला नदीत फेकून लेस्बियन कपलची आत्महत्या
Just Now!
X