News Flash

“मी वडिलांची हत्या केली आहे, अटक करण्यासाठी या,” मुलीच्या फोनने पोलीसही चक्रावले

मुलीने वडिलांच्या डोक्यावर धोपटण्याने वार करुन हत्या केली

प्रातिनिधिक

दारु पिऊन सतत आईला मारहाण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या वडिलांची १६ वर्षीय मुलीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भोपाळमध्ये हा प्रकार घडला आहे. कपडे धुण्यासाठी वापरणाऱ्या धोपटण्याने मुलीने वडिलांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुलीने १०० नंबरवर पोलिसांना फोन करुन आत्मसमर्पण केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती बेरोजगार होती. आपल्या मोठ्या मुलाच्या कमाईवरच त्याचा खर्च भागत होता. सतत दारु पित असल्याने आणि हिंसाचार करत असल्याने कुटुंब कंटाळल होतं. बुधवारी संध्याकाली ६.३० वाजण्याच्या सुमारास घरात मुलाच्या लग्नाची चर्चा असताना पीडित व्यक्तीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

यामुळे चिडलेल्या मुलीने धोपटणं उचललं आणि वडिलांच्या डोक्यावर वार करण्यास सुरुवात केली. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलीने १०० नंबरवर पोलिसांना फोन केला आणि आपण हत्या केली असून अटक होण्यासाठी वाट पाहत आहोत असं सांगितलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 3:47 pm

Web Title: girl kills faher for beating mother and surrender to police sgy 87
Next Stories
1 बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी करोना पॉझिटिव्ह
2 सरकारचा महत्त्वाचा निर्णय, आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा
3 भारताचा मोठा विजय! कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठीचं विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मंजूर
Just Now!
X